शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मॅरेथॉनमध्ये धावले हजारो धावपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:22 IST

रोटरी क्लब आॅफ नाशिक, अंबडच्या वतीने आयोजित मिनी मॅरेथॉनमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांसह हजारो धावपटूंनी यात सहभाग घेतला. विजेत्या धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

सिडको : रोटरी क्लब आॅफ नाशिक, अंबडच्या वतीने आयोजित मिनी मॅरेथॉनमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांसह हजारो धावपटूंनी यात सहभाग घेतला. विजेत्या धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.  अश्विनीनगर येथील राजे संभाजी स्टेडियम येथे रोटरी क्लब आॅफ नाशिक, अंबडच्या वतीने आयोजित दहावी मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवारी मोठ्या उत्सवात पार पडली. या स्पर्धा १२ ते १४ , १५ ते १७ व १८ वर्षांपुढील मुले आणि मुलींमध्ये घेण्यात आल्या. यावेळी वेगवेगळ्या गटात विजयी झालेले तानाजी नर्मदे, सुरेश कोंडार, यशवंत पवार, शिवाजी सांडखोरे, किशोर मलकांब, गणपत मुठाळ, धोंडराम पारधी, सुरेश पालवी, कोंडाजी गुंबाडे, हरिश्चंद्र मंडलिक, प्रभाकर पारथी, हरिभाऊ थेटे, अनंत कसबे, दशरथ थेटे, हरी शेवरे, संतू लिलके, कल्लू लोटे, रामदास गायकावाड, मधुकर वाघ, निवृत्ती उंबाळे, पुंडलिक पारधी, लहानू कुंर्द, विठ्ठल लिलके, अशोक कुंभार, ब्रिजलाल गवळी, नवसू बेंडकोळी, वाळू लिलके, वसंत पिंपरुळे आदी विजेत्या धावपटंूना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, रवींद्र सपकाळ, हिरामण अहेर आदी उपस्थित होते.  कार्यक्रमास रोटरी क्लब, नाशिक अंबडचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अजित भामरे, अध्यक्ष विपूल लोया, सचिव जयंत पवार, टी. एच. पाटील, संतोष भट्ट, दीपक तावडे, नितीन थोरात, भास्कर पवार, मेजर डी. के. झरेकर आदी सहभागी झाले होते. गेल्या दहा वर्षांपासून या स्पर्धा सलग घेण्यात येत असून पहिल्या वर्षी लोकप्रिय धावपटू कविता राउत यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात येतात. १०व्या मॅरेथॉन स्पर्धेत नाशिक मुंढेगाव येथील इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला. स्पर्धा पार पडल्यानंतर या विद्यार्थ्यांनी संपूर्ण मैदान तसेच परिसर स्वच्छ केला.- डॉ. अजित भामरे,  संस्थापक अध्यक्ष, रोटरी क्लब

टॅग्स :Sportsक्रीडाMarathonमॅरेथॉन