शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार बीएसएनएलमुळे हजारो मोबाईल ‘नॉट रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 17:28 IST

पाटोदा केंद्राचा वीजपुरवठा खंडित : संपर्कसेवा बंद पडल्याने गैरसोय

ठळक मुद्देचार पाच महिन्यापूर्वीही या कार्यालयाचा सुमारे महिनाभर वीज पुरवठा खंडित होता

पाटोदा : गेल्या जुलै महिन्यापासून विज बिल थकविल्यामुळे वितरण कंपनीने पाटोदा येथील बीएसएनएल कार्यालयाचा विज पुरवठा खंडित केल्याने गेल्या तीन दिवसांपासून येथील शेकडो दूरध्वनी व सुमारे पाच हजाराहून अधिक मोबाईल ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला असून दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येत असल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.पाटोदा येथे बीएसएनएलचे केंद्र असून गावात शंभरपेक्षा जास्त दूरध्वनी ग्राहक असून सुमारे सहा ते सात हजार मोबाइलधारक बीएसएनएलची सेवा वापरत आहेत. विज वितरण कंपनीकडून या कार्यालयाला विज पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या जुलै महिन्यापासून बीएसएनएलने विज बिल न भरता सुमारे दोन लाख ११ हजार रु पयांचे वीज बिल थकविले आहे. शिवाय मागीलही काही लाख रु पये थकबाकी असल्याने वारंवार सूचना देऊनही बिल भरण्यास टाळाटाळ होत असल्याने विज वितरण कंपनीने कठोर कारवाई करीत बुधवारपासून केंद्राचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पाटोदा गावासह ठाणगाव, पिंपरी,आडगाव रेपाळ, कानडी, विखरणी, दहेगाव पाटोदा, शिरसगाव लौकी या भागातील संपूर्ण दूरध्वनी तसेच मोबाईल सेवा बंद पडली आहे. संपर्क सेवाच बंद झाल्याने नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत. चार पाच महिन्यापूर्वीही या कार्यालयाचा सुमारे महिनाभर वीज पुरवठा खंडित होता. केंद्राने वीज बिल भरावे यासाठी ग्राहकांना आंदोलन करावे लागले होते. या महिनाभराच्या कालावधीतील दूरध्वनी बिले मात्र ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा खंडित विजपुरवठ्यामुळे कनेक्टीव्हिटी नसल्याने पाटोदा येथील सर्व आॅनलाइन सेवा तसेच बँकेचे बीसी केंद्र बंद पडले आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकBSNLबीएसएनएल