शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जवाहर नेहरू अभियानाचे थकले शंभर कोटी

By admin | Updated: August 7, 2014 01:44 IST

जवाहर नेहरू अभियानाचे थकले शंभर कोटी

 नाशिक : केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर ‘अच्छे दिन’ येतील, असे म्हणणाऱ्या नाशिक महापालिकेला मात्र बुरे दिन आले आहेत. कुंभमेळ्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळत नाही, राज्य शासन थकीत अनुदान देत नाही आणि आता केंद्र शासनाच्या अखत्यारितील नेहरू अभियानाच्या प्रलंबित निधीची भर पडली आहे. गेल्या वर्षभरापासून सुमारे १०२ कोटी रुपये थकले असून, तरीही केंद्र शासन निधी देत नसल्याने पालिकेला आणखीनच ओढाताणीला सामोरे जावे लागत आहे.केंद्रातील संपुआ सरकारने राबविलेल्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत निवडलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविले जातात. त्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ७० टक्के निधी केंद्र आणि राज्य शासन देते. त्यातही केंद्र शासन ५० टक्के, तर राज्य शासन २० टक्के याप्रमाणे ७० टक्के निधी देते. उर्वरित खर्च संबंधित महापालिकेला करावा लागतो. महापालिकेने राबविलेल्या विविध योजनांसाठी केंद्र शासनाचा वाटा मिळत नसल्याची तक्रार आहे. पालिकेने राबविलेल्या ५५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा सक्षमीकरण योजनेतील ३.५० कोटी, भुयारी गटार योजना टप्पा-१ मधील एक कोटी ८५ लाख रुपये, घनकचरा व्यवस्थापन योजनेतील ३.८० कोटी, पावसाळी गटार योजनेतील १२ कोटी ७० लाख रुपये, गोदावरी घाट सुशोभिकरण योजनेअंतर्गत सात कोटी ७२ लाख, तर भुयारी गटार योजना टप्पा-२ मधील तब्बल ७२ कोटी १६ लाख रुपये केंद्र शासनाकडे थकले आहेत. यातील भुयारी गटार योजना टप्पा-२ चे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याव्यतिरिक्त अन्य योजनांची कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. तरीही पूर्ण झालेल्या कामांच्या निधीसाठी पालिकेला तगादा लावावा लागत आहे.राज्य शासनाकडे महापालिकेचे कोट्यवधी रुपये थकले असून, त्यात रस्ते अनुदान सहा कोटी, पाणीपुरवठा योजना १७ कोटी १३ लाख, भुयारी गटार योजना अनुदान १९ कोटी ३१ लाख रुपये थकले आहेत; शिवाय इंडिया बुल्सचा उपयोगकर्ता शुल्क मिळावे यासाठी पालिका तगादा लावत असताना, आता केंद्र शासनाकडून हक्काचा निधी मिळत नसल्याने पालिकेला केंद्राच्या मिनतवाऱ्या करण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)