टीम लोकमत ।नाशिक : कोरोनाचे संकट जिल्ह्यात थैमान घालत असल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणीहोत आहे. यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर अनेक निराधारांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत उपेक्षितांच्या मुखी दोन घास पडावेत, त्यांचेही जगणे सुलभ व्हावे,या समाजिक दातृत्वाच्या भावनेतून जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकव शैक्षणिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह मास्क आणिसॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. हा मदतीचा महापूर गोदातीरी भरभरून वाहत असल्याने माणुसकीचा दाटलेला गहिवर सर्वत्र दिसून येत आहे. तर ’देणाºयाचे हात हजारो’ असून कोणत्याही रंजल्यागांजलेल्याची उदरझोळी रिती राहत नसल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे.मनमाडला शिवा संघटनेतर्फे गरजूंना पोळीभाजीचे वाटपमनमाड : कोरोनाने देशभरात प्रचंड धुमाकूळ घातला असल्याने अनेकांना जगणे मुश्कील झाले आहे. असंख्य अनाथ लोकांच्या पोटापाण्याचे काय हा प्रश्न गंभीर झाला असताना येथील शिवा संघटना आणि लिंगायत समाज बांधवांकडून गरजूंना पोळीभाजी वाटप करण्यात आले.लॉकडाउन झाल्यापासून शहरात नागरिक घरांमध्ये आहेत आणि संचारबंदी लागू झाल्यामुळे मुक्त संचार करणे अवघड झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर येथील शहरातील अनाथ लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अनेक सामाजिक संस्था संघटना आणि तरूण पुढे येऊन गोरगरिबांना अन्न-पाणी देण्याचे काम करीत आहेत. या उपक्र मात कैलास वाडकर, शशिकांत काखंडकी, अशोक बिदरी, करण वाडकर, हर्षद कोरपे, नितीन गुळवे, विजू तोडकर, संतोष चिनुके, प्रशांत तक्ते, प्रकाश नाईक, सिद्धेश गुळवे, शुभम सोनवणे, गोरख सोनवणे, सौरभ वाडकर, नितीन चिनुके आदी सहभागी झाले आहेत.विंचूरला गरिबांना धान्य वाटपविंचूर : सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने गोरगरिबांना विविध संघटना, संस्था यासह वैयिक्तक पातळीवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.येथे पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, युवा नेते नरेश परदेशी यांनी गरिबांना जीवनावश्यक वस्तू व किराणामालाचे वाटप केले.वैभव शेवाळे, रामदास पुंड या शेतकऱ्यांनी गहू उपलब्ध करून त्याचे वाटप आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक देवीदास लाड, तलाठी शिर्के, योगेश गायकवाड यांच्याहस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
देणाऱ्याचे हात हजारो..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:04 IST
उपेक्षितांच्या मुखी दोन घास पडावेत, त्यांचेही जगणे सुलभ व्हावे, या समाजिक दातृत्वाच्या भावनेतून जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. हा मदतीचा महापूर गोदातीरी भरभरून वाहत असल्याने माणुसकीचा दाटलेला गहिवर सर्वत्र दिसून येत आहे. तर ’देणाºयाचे हात हजारो’ असून कोणत्याही रंजल्यागांजलेल्याची उदरझोळी रिती राहत नसल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे.
देणाऱ्याचे हात हजारो..!
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : जिल्हाभरात सामाजिक संघटनांतर्फे गरजूंना साहित्य वाटप