शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चोकसीने नाशिकच्या कंपनीवरही काढले हजारो कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 01:14 IST

पंजाब नॅशनल बँकेतून १३ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशी फरार झालेल्या मेहूल चोकसीने नाशिकमधील रद्द झालेल्या इगतपुरी सेझ प्रकल्पातील मल्टिसर्व्हिसेस कंपनीच्या नावावरही जवळपास ३ हजार ८६० कोटींचे कर्ज काढल्याचा दावा नाशिकमधील माहिती अधिकार कार्यकर्ते देवांग जानी यांनी शुक्रवारी (दि.२५) त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक : पंजाब नॅशनल बँकेतून १३ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशी फरार झालेल्या मेहूल चोकसीने नाशिकमधील रद्द झालेल्या इगतपुरी सेझ प्रकल्पातील मल्टिसर्व्हिसेस कंपनीच्या नावावरही जवळपास ३ हजार ८६० कोटींचे कर्ज काढल्याचा दावा नाशिकमधील माहिती अधिकार कार्यकर्ते देवांग जानी यांनी शुक्रवारी (दि.२५) त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.मेहूल चोकसी याने पीएनबीसोबतच देशातील अन्य बँकांनाही हजारो कोटींचा चुना लावला असल्याचा आरोप करीत संबंधित बँकांची नावे आपल्याला माहीत आहेत; परंतु ही नावे उघड केल्यास देशातील बँकिंग व्यवस्था कोलमडून सर्वसामान्यांचा पैसा अडकण्याची भीती असल्याने या बँकांची ओळख जाहीर करीत नसल्याचे देवांग जानी यांनी सांगितले. ते म्हणाले, इगतपुरी सेझ प्रकल्पात १०० हेक्टर जागेवर गीतांजली जेम्सच्या मल्टिसर्व्हिस कंपनीची नोंदणी झालेली असून, यात मेहूल चोकसीची पत्नी प्रिती चौकसी व सुधीर मेहता हे संचालक आहे. याच कंपनीच्या जागेचा तारण म्हणून वापर करीत मेहूल चोकसीने सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेकडून ५२ कोटी, तर दुसऱ्या एका बँकेकडून तब्बल ८१० कोटी ७३ लाख रुपयांचे क र्ज उचलले आहे. हा प्राथमिक स्वरूपातील माहितीवर आधारित आकडा आहे.मेहूल चौकसी फरार झाला असला तरी अन्य सर्व संचालक मोकळे आहेत. तेही या घोटाळ्यात बरोबरीने सामील असल्याचे सांगतानाच त्यांच्यावरही कारवाई केल्यास देशातील सर्वांतमोठा घोटाळा समोर येण्याची साशंकता देवांग जानी यांनी व्यक्त केली.गीतांजली जेम्सच्या एकूण ४५ उपकंपन्या असून, या सर्व कंपन्या मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील लक्ष्मी टॉवरच्या आॅफिस क्रमांक ६च्या पत्त्यावर नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आलटून पालटून सर्व कंपन्यांमध्ये ठरावीक व्यक्तींनाच संचालक करण्यात आले आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीNashikनाशिक