शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो प्रकरणे वर्षानुवर्षे चौकशीच्या फेऱ्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:57 IST

जात पडताळणीची बहुतांश प्रकरणे दक्षता पथक आणि चौकशी समितीसमोरच रेंगाळत असल्यामुळे वर्षानुवर्ष हजारो प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकून पडली आहेत. कर्मचाऱ्यांची अपूर्ण संख्या आणि अस्थिर झालेली पडताळणी समिती यामुळे प्रकरणांचा निपटारा अधिकच संथगतीने होत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक पुराव्यावर संशय चौकशीसाठी सर्वाधिक सहा हजार प्रकरणे असल्याने होतोय विलंब

नाशिक : जात पडताळणीची बहुतांश प्रकरणे दक्षता पथक आणि चौकशी समितीसमोरच रेंगाळत असल्यामुळे वर्षानुवर्ष हजारो प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकून पडली आहेत. कर्मचाऱ्यांची अपूर्ण संख्या आणि अस्थिर झालेली पडताळणी समिती यामुळे प्रकरणांचा निपटारा अधिकच संथगतीने होत असल्याचे समोर आले आहे.आदिवासी विकास विभागातील जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या काराभाराबाबतचे अनेक प्रकरणे समोर आल्यानंतरही या विभागाचा कारभार अद्यापही सक्षम होऊ शकलेला नाही. पडताळणी समितीमध्ये चार सदस्य नियुक्त असल्याशिवाय प्रकरणांची पडताळणी होऊ शकत नाही. परंतु सातत्याने समिती सदस्यांमध्ये होणारे बदल आणि खांदेपालट यामुळे पडताळणी प्रकरणांना ब्रेक लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच चार सदस्यांचा कोरम पूर्ण करण्यात आल्याने आता प्रकरणे निकाली काढली जातील, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात या चार सदस्यांकडे समितीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्यामुळे ज्या गतीने प्रकरणे निकाली निघणे अपेक्षित आहे, तितक्या गतीने प्रमाणपत्रे निकाली निघत नसल्याचा पाढा पुन्हा सुरू झाला आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपाध्यक्षांकडे नाशिकबरोबरच औरंगाबादचादेखील कार्यभार असल्याने आठवड्यातील दोन दिवस त्यांना तिकडे कामकाज करावे लागते.कामकाजातील दिरंगाई आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही संबंधित विद्यार्थ्यांना पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबत दिरंगाई केल्याप्रकरणी येथील तीन कर्मचाºयांवर यापूर्वी दंडात्मक कारवाई होऊनदेखील त्यातून इतरांना बोध घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अजूनही सुमारे सहा हजार प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.प्राधान्यक्रमच नसल्याने अधिक विलंबजातप्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्रे वितरित करण्यास विलंब होत असल्याचा कारणांचा धांडोळा घेतला असता दाखल होणाºया प्रकरणांचा प्राधान्यक्रमच निश्चित नसल्याने ज्यांना आत्यंतिक गरज आहे त्यांना प्रमाणपत्र न मिळता ज्यांना अपेक्षित नाही अशांनाही प्रसंगी प्रमाणपत्र मिळून जाते. वास्तविक शैक्षणिक कामांसाठीच्या प्रकरणांचा निपटारा होणे अपेक्षित असताना ज्या अभ्यासक्रमांसाठी पडताळणी प्रमाणपत्रांची गरज नसते अशी प्रकरणेदेखील समितीसमोर येत असल्याने समितीचा वेळ वाया जातोच शिवाय ज्यांना आवश्यकता आहे. त्यांची प्रतीक्षा यादी वाढत जाते.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारCaste certificateजात प्रमाणपत्र