शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

हजार शिक्षकांचा पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणात सहभाग

By admin | Updated: June 9, 2014 01:04 IST

टाकळी : इयत्ता तिसरी आणि चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरात सुमारे ९२२ शिक्षकांनी सहभाग घेतला

 

टाकळी : इयत्ता तिसरी आणि चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरात सुमारे ९२२ शिक्षकांनी सहभाग घेतला असून, या प्रशिक्षणात अभ्यासाबरोबरच खेळातून शिक्षण असे प्रशिक्षण दिले जात आहे. तपोवन रोडवरील पोद्दार इंटरनॅशनल शाळेत या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गशिक्षकांचे हे पाचदिवसीय प्रशिक्षण सुरू झाले आहे. या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण महापालिकेच्या वतीने दिले जात आहे. यामध्ये एकूण ९२२ प्रशिक्षणार्थी शिक्षक सहभागी झाले आहेत. प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेतलेले ६० तज्ज्ञ मार्गदर्शक व राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेले आठ तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना मार्गदर्शन करीत असल्याचे मनपा शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले. इयत्ता तिसरीकरिता मराठी माध्यमाचे ३०४, इंग्रजी माध्यमाचे १७६ शिक्षक सहभागी झाले आहेत. चौथीसाठी मराठी माध्यमाचे ३०५, इंग्रजी माध्यमाचे १६७ शिक्षक सहभागी झाले आहेत. उर्दू माध्यमाच्या ५० शिक्षकांना मालेगाव येथील एटीटी हायस्कूल येथे प्रशिक्षण दिले जाणार असून, येत्या सोमवारपासून प्रशिक्षणास प्रारंभ होणार आहे. सर्व शिक्षकांना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ अंतर्गत प्राथमिक शिक्षक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. ज्ञानरचनावाद, माहिती तंत्रज्ञान, गटकार्य, वर्ग अध्ययन, अध्यापनाचे दिग्दर्शन, स्वाध्याय व स्वअभ्यास अशी या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत. राजश्री गांगुर्डे, पुष्पा नवले, विजय निपाणीकर, विजया पणूवाले, मंगला एखंडे, भारती पाटील, अश्विनी देशमुख, संगीता बाविस्कर हे मार्गदर्शन करीत आहेत. दरम्यान, शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी या प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. (वार्ताहर)