ंमालेगाव : टेहरे चौफुलीजवळील सुमन एजन्सी दुकानाच्या मागे मोकळ्या जागेवर विनापरवाना बेकायदेशीररीत्या २५ हजार ३५७ रुपये किमतीच्या १३४ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या कब्जात बाळगणाऱ्या विवेक वसंतराव बच्छाव (३५), रा. शिवाजी पुतळ्याजवळ सोयगाव यास कॅम्प पोलिसांनी अटक केली. रविवारी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस कर्मचारी रतिलाल वाघ यांनी फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.
मद्याच्या बाटल्या बाळगणाऱ्यास अटक
By admin | Updated: July 4, 2017 23:39 IST