शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोन बालिका बचावल्या पण..

By admin | Updated: June 10, 2017 01:37 IST

नाशिक : जुन्या नाशकातील काझीची गढी...येथील दोन चिमुकल्या तोल जाऊन खाली कोसळल्या... पण दैव बलवत्तर... त्या दोघी या दुर्दैवी घटनेतून सुखरूप बचावल्या

.अझहर शेख। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जुन्या नाशकातील काझीची गढी...उंची अंदाजे दोनशे ते अडीचशे फूट...येथील एकाच कुटुंबातील अवघ्या वर्षभराच्या दोन चिमुकल्या तोल जाऊन खाली कोसळल्या... पण दैव बलवत्तर... त्या दोघी या दुर्दैवी घटनेतून सुखरूप बचावल्या अन् आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. या घटना भूतकाळातील असल्या तरी वर्तमान परिस्थिती ‘जैसे-थे’ आहे, किंबहुना त्यापेक्षाही भयंकर झाली असल्याने गढीच्या घरांवर संकटाचे ढग दाटलेलेच आहे.धोकादायक काजीच्या गढीवरील कुटुंबीयांचा वर्षानुवर्षांपासून सुरक्षेसाठी संघर्ष सुरू आहे. त्यांचा हा संघर्ष अनेकदा लहानग्यांच्या जिवावरही बेतला आहे. येथील तारू कुटुंबातील साक्षी आज दहा वर्षांची झाली आहे तर कार्तिकी चार वर्षांची आहे. शेकडो फूट उंचीच्या गढीवरून साक्षी अवघी बारा महिन्यांची असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास खाली पडली होती. तर २०१५साली कार्तिकीसुद्धा गढीवरू न दुपारच्या सुमारास घरात खेळताना खाली पडली होती. तारू कुटुंबावर एकापाठोपाठ असे संकट ओढवले; मात्र हे कुटुंब व दोन्ही चिमुकल्या या संकटातून सावरल्या आहेत; तरीदेखील दरवर्षी वादळी वारा व पाऊस सुरू झाल्यानंतर तारू कुटुंबासह अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतोच. जिवाला धोका जरी असला तरी गरिबीमुळे शहरात कोणत्याही ठिकाणी वास्तव्यास जाणे परवडणार नसल्याचे येथील रहिवासी सांगतात. त्यामुळे स्थलांतर करायचे कसे? हा प्रश्न नागरिकांबरोबरच प्रशासनापुढेही कायम आहे. दरवर्षी गढी पावसाळ्यात ढासळत असते आणि प्रशासनाचीदेखील धावपळ होते. गढीला संरक्षक भिंत बांधावी, यासाठी दोन वर्षांपूर्वी जोरदार हालचाली झाल्या. नेत्यांनी दौरे केले आणि गढीची मातीदेखील तपासली गेली. शासनाकडे वीस कोटी रुपयांचा प्रस्तावही मंजुरीसाठी पाठवून संरक्षक भिंत बांधण्याबाबत महापालिकेला सुचविले. (क्रमश:)