शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नऊ विवाहेच्छुकांच्या जुळल्या रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:07 IST

एचआयव्ही बाधित रुग्णाच्या जीवनाच्या आशा धुसर असतात असे बोलले जाते; मात्र वेळोवेळी योग्य औषधोपचार घेत एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीदेखील आपला जीवनसाथी सहजरीत्या शोधून संसाराचा गाडा हाकू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शहरात अशा प्रकारच्या नऊ विवाहेच्छुकांच्या रेशीमगाठी जुळून येण्याचा योग आला.

नाशिक : एचआयव्ही बाधित रुग्णाच्या जीवनाच्या आशा धुसर असतात असे बोलले जाते; मात्र वेळोवेळी योग्य औषधोपचार घेत एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीदेखील आपला जीवनसाथी सहजरीत्या शोधून संसाराचा गाडा हाकू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शहरात अशा प्रकारच्या नऊ विवाहेच्छुकांच्या रेशीमगाठी जुळून येण्याचा योग आला.निमित्त होते, महिंद्रा आणि महिंद्राच्या यश फाउंडेशन-नाशिक नेटवर्क आॅफ पॉझिटिव्ह पिपल आणि चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही, विहान प्रकल्प मालेगाव व जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या संयुक्त विद्यमाने गंजमाळ येथील रोटरी क्लबच्या सभागृहात राज्यस्तरीय ‘मंगल मैत्री मेळावा’ रविवारी (दि.२०) पार पडला. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून १२२ वर व ७८ विवाहेच्छुकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण अहेर, कमलाकर घोंगडे, जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे योगेश परदेशी, संगीता पवार, डॉ. भूषण सुरजुसे, डॉ. सागर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अहेर म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात विवाह हा अविभाज्य घटक असतो. प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी साथीदार हवा असतो तसा तो एचआयव्ही विवाहेच्छुकांनाही हवा असतो. त्यामुळे एचआयव्ही सहजीवन जगणाºया व्यक्तींनी आपल्या मनात दृढ आत्मविश्वास ठेवावा. मनातून खचून न जाता हिमतीने आयुष्य जगावे. प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी केले व सूत्रसंचालन चंदा थेटे यांनी केले.दरम्यान, गेल्या वर्षीच्या मंगल मैत्री मेळाव्यात जुळून आलेल्या एका वैवाहिक जोडप्याचा यावेळी गौरव करण्यात आला. दरम्यान, नऊ विवाहेच्छुकांचे विवाह यावेळी जुळून आले. मागील वर्षी पाच विवाह जुळून आले होते. गेल्या दहा वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे

टॅग्स :HIV-AIDSएड्सNashikनाशिक