शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

‘त्या’ शेतकऱ्यांनी घरोघरी जाऊन विकली द्राक्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:24 IST

योगेश सगर। लोकमत न्यूज नेटवर्क कसबे सुकेणे : कोणी म्हणे बेदाणा करा.. कोणी म्हणे दहा रुपये किलोने व्यापाºयाला द्या.. अनेकांनी तर द्राक्षबाग तोडायचे सल्ले दिले.. द्राक्षांचे करायचे काय? तीन लाख रुपये कर्ज कसे फेडायचे ? त्यादिवशी रात्रभर झोप नाही.. असा विचार करताना एक कल्पना सुचली. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने आपणच आपली द्राक्षे विकली तर ? आणि सकाळी उठलो.. इतरांनाही कल्पना पटली.. आणि मजूर, व्यापारी, हातविक्री, किरकोळ व्यावसायिकांच्या भूमिकेत थेट नाशिक गाठले. गल्लोगल्ली जाऊन ‘नाशिकची गोड.. द्राक्ष.. घ्या.. शेतकºयाला मदत करा..’ असं म्हणत म्हणत आमची दोन तासात तब्बल दहा क्विंंटल द्राक्ष हातोहात संपली...

योगेश सगर।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : कोणी म्हणे बेदाणा करा.. कोणी म्हणे दहा रुपये किलोने व्यापाºयाला द्या.. अनेकांनी तर द्राक्षबाग तोडायचे सल्ले दिले.. द्राक्षांचे करायचे काय? तीन लाख रुपये कर्ज कसे फेडायचे ? त्यादिवशी रात्रभर झोप नाही.. असा विचार करताना एक कल्पना सुचली. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने आपणच आपली द्राक्षे विकली तर ? आणि सकाळी उठलो.. इतरांनाही कल्पना पटली.. आणि मजूर, व्यापारी, हातविक्री, किरकोळ व्यावसायिकांच्या भूमिकेत थेट नाशिक गाठले. गल्लोगल्ली जाऊन ‘नाशिकची गोड.. द्राक्ष.. घ्या.. शेतकºयाला मदत करा..’ असं म्हणत म्हणत आमची दोन तासात तब्बल दहा क्विंंटल द्राक्ष हातोहात संपली...देवपूरचे संतोष शिरसाठ, दात्याणेचे गोरख गुरगुडे, पिंंपळगावचे केशव बनकर आणि उंबरखेडचे विकास आथरे या तरुण शेतकºयांनी कोरोनाच्या लॉकडाउन काळात आलेल्या संकटावर मात करण्याचा असा उपाय शोधला. निफाड तालुक्यातील चार शेतकºयांनी कोरोनामुळे ओढवलेल्या संकटाचा धीराने सामना करत विक्रीच्या कडू-आंबट संघर्षात चांगली कमाई केली. या चार शेतकºयांनी स्वत:च मजूर, व्यापारी बनत आपल्या बागेतील द्राक्ष पॅकिंंग करून महाराष्ट्रातल्या विविध बाजारपेठांमध्ये विक्री सुरू केली आहे.कोणत्याही परिस्थितीत हार न मानता दारोदारी जाऊन घरपोहोच द्राक्ष विक्री सुरू केली आहे आणि किरकोळ व्यापारातून दोन पैसेही हातात पडू लागले. याकामी त्यांना जिल्हा प्रशासनानेही सहकार्य केले. कोरोनाच्या मंदीमधून संधी शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यापुढेही आपण याच व्यवस्थेत काम करून उत्पादक ते ग्राहक ही थेट वितरणव्यवस्था निर्माण करून ग्राहकाला दर्जेदार माल देत मधल्या दलालांच्या साखळीतून ही वितरणप्रणाली मुक्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे हे तरुण शेतकरी सांगतात.

टॅग्स :Nashikनाशिक