शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी ३५० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 00:36 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस उपविभागातील ९ व कॅम्प पोलीस उपविभागातील ६ अशा पंधरा जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर दोघा विभागातील साडेतीनशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. तसेच नाकाबंदी, कोंबिंग आॅपरेशन राबविले जात आहे.

ठळक मुद्देपोलीस सतर्क : १५ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर

मालेगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस उपविभागातील ९ व कॅम्प पोलीस उपविभागातील ६ अशा पंधरा जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर दोघा विभागातील साडेतीनशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. तसेच नाकाबंदी, कोंबिंग आॅपरेशन राबविले जात आहे.लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ केला आहे.शहर पोलीस उपविभागातील ९ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस प्रमुख व प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत, तर ११० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. यापूर्वी शहर उपविभागातून २५ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित ११ प्रस्तावांवर सुनावणी सुरू आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. कॅम्प पोलीस उपविभागातील सहा जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर सुमारे २४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी पाठविण्यात आलेल्या पाच हद्दपारीच्या प्रस्तावांवर सुनावणी सुरू आहे. शहर व कॅम्प विभागात पोलिसांकडून कोंबिंग आॅपरेशन, नाकाबंदी केली जात आहे. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहेत. चौकाचौकांत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस हॉटेल्स, बिअरबार यांचीही तपासणी केली जात आहे.पिस्तूल बाळगणाऱ्याला कोठडीशहरातील रजा चौक भागात अवैधरीत्या पिस्तूल बाळगणाºया इम्रानखान अताउल्लाहखान ऊर्फ शेट्टी याला पवारवाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेट्टी याला यापूर्वी बºहाणपूर पोलिसांनी आठ लाखांच्या घरफोडीत अटक केली होती. १३ मार्चला जामिनावर सुटका झाल्यानंतर शेट्टी हा पिस्तूल बाळगताना पोलिसांना आढळून आला. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliceपोलिस