गंगापूर नाक्यावरील घटना : बलात्कार्यांमध्ये नातेवाईकांचा समावेशनाशिक : सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील जुना गंगापूर नाका परिसरात राहणार्या एका १४ वर्षीय मुलीला धमकावून तसेच मारहाण करून तिच्या सख्ख्या भावासह नात्यातील तिघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे़ त्यांना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुना गंगापूर नाका परिसरात राहणार्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देऊन, प्रसंगी मारहाण करून संशयित राजू हनुमंता माला (२२), राजू दस्तप्पा माला (२२), नरेश व्यंकटप्पा भंडारी (२२), प्रभाकर विरुनप्पा हरिजन (२२) या चौघांनी सामूहिक बलात्कार केला़ २७ एप्रिल ते ८ मेदरम्यान या मुलीवर सतत अत्याचार होत होता़ दरम्यान, ही घटना मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी मंगळवारी दुपारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फि र्याद दिली़या बलात्कार प्रकरणातील संशयितांवर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यातील संशयित राजू माला, नरेश भंडारी, प्रभाकर हरिजन या तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली असून, एक फ रार झाला आहे़ अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता १९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले़ दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राजगुरू करीत आहेत़ (प्रतिनिधी)
सख्ख्या भावासह तिघांनी केला अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By admin | Updated: May 14, 2014 10:33 IST