शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या माळेला ४० हजार भाविक देवीचरणी नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:21 IST

गवतीची पंचामृत महापूजा शिवसेनेचे महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समीतीचे प्रमुख आमदार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आली.

कळवण : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात सोमवारी पाचव्या माळेला भगवतीची पंचामृत महापूजा शिवसेनेचे महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समीतीचे प्रमुख आमदार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आली.  सोमवारी सकाळी ७.३० वाजता सप्तशृंगी देवीवर सुवर्ण अलंकार अर्पण करण्यात आले. पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ८ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. दुपारी १२ वाजता देवीची पंचामृत महापूजा करण्यात येऊन हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली. पहिल्या माळेपासूनच भाविकांचा सुरू झालेला ओघ पाचव्या माळेलादेखील वाढता दिसून आला. पाचव्या माळेला ४० हजार देवीभक्त देवीच्या चरणी नतमस्तक झाले. देवीभक्तांमधील उत्साहामुळे गडावर चैतन्याचे वातावरण पसरले आहे. दैनंदिन अलंकार पूजा, मिरवणूक व पूजन आदी विधीदेखील चैतन्यपूर्ण वातावरणात व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत आहे.गडावर येणाºया भाविकांमध्ये  तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. नांदुरी ते गड या घाट रस्त्यावर निर्माण झालेले धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्याने या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह भक्तगणांना होत असल्याचे पाहता घाट व वळणरस्त्यावर उतरून कुठेही सेल्फी न घेण्याचे, तसेच भाविकांनी स्वत:बरोबर इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी केले आहे. दुपारचे कडक ऊन, रात्रीचा गारवा अशा वातावरणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली आहे.फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू करण्याची मागणीच्नाशिक : सप्तशृंगगडावर सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह भाविकांना या काळात गडाच्या पायºया चढून जावे लागू नये, म्हणून तत्काळ गडावर सुस्थितीत असलेली फ्यूनिक्युलर ट्रॉली (रोप-वे) सुरू करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गडावर फ्यूनिक्युलर ट्रॉली अद्याप सुरू झालेली नाही. वयोवृद्ध व अपंग भक्तांना यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी मंदिरापर्यंत जाता यावे यासाठी फ्यूनिक्युलर ट्रॉलीची चाचणी घेऊन तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.