शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

थर्टी फर्स्टला जिल्ह्यात १७८ तळीरामांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:49 IST

नाशिक : थर्टी फर्स्ट अर्थात ३१ डिसेंबरला मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील १०९, तर ग्रामीण हद्दीतील ६९ अशा एकूण १७८ तळीरामांवर पोलिसांनी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची कारवाई केली़ या व्यतिरिक्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहरातील ४११ वाहनधारकांकडून ९८ हजार ९०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले, तर ग्रामीण भागात मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या १८५ केसेस करून ३८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ दरम्यान, शहरातील तळीरामांवरील कारवाईचा विचार करता गत दोन वर्षांत करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे़

ठळक मुद्दे आयुक्तालयातही विशेष मोहीम : ३८ हजार रुपयांचा दंडही वसूल ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़

नाशिक : थर्टी फर्स्ट अर्थात ३१ डिसेंबरला मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील १०९, तर ग्रामीण हद्दीतील ६९ अशा एकूण १७८ तळीरामांवर पोलिसांनी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची कारवाई केली़ या व्यतिरिक्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहरातील ४११ वाहनधारकांकडून ९८ हजार ९०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले, तर ग्रामीण भागात मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या १८५ केसेस करून ३८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ दरम्यान, शहरातील तळीरामांवरील कारवाईचा विचार करता गत दोन वर्षांत करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे़नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, तर ग्रामीणमध्ये अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ शहर वाहतूक पोलिसांनी ४१ ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत सुमारे शंभराहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली, तर ग्रामीणमधील ४० पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ त्यासाठी जिल्ह्णातील महामार्ग, वर्दळीचे ठिकाणे,चेक पोस्ट आदी ठिकाणी बॅरिकेड व नाकाबंदी करण्यात आली होती़ ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्हला लगाम घालण्यासाठी ब्रिथ अ‍ॅनालायझर मशीनने तपासणी करण्याबरोबरच हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट या ठिकाणांवर फिक्स पॉइंट लावून वाहतूक कोंडी आणि सुरक्षात्मक योजनांची अंमलबजावणी करण्यात आली होती़रविवारी सुटीचा दिवस असल्याने शहरात थर्टी फर्स्ट जोरात साजरा केला जाणार, असा अंदाज होता़ मात्र दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट होता, तर सायंकाळनंतर तरुणाई तसेच नागरिक सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडले़ शहरातील बड्या हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होते़, तर दुसरीकडे मद्यप्राशन करीत वाहन चालवून स्वत: तसेच इतरांच्या अपघातास कारणीभूत ठरू नका, असा संदेश पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला होता़ गंगापूररोड, शरणपूररोड, कॉलेजरोड, आनंदवली रस्ता, मखमलाबाद-आनंदवली गोदाकाठ रस्ता, मुंबई नाका, द्वारका, इंदिरानगर अशा शहरातील जवळपास सर्वच परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रत्येक चौकांमध्ये तसेच सिग्नलवर पोलीस कर्मचाºयांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती.शहर वाहतूक पोलिसांच्या ४२ ठिकाणच्या नाकाबंदीत दुचाकीधारकांची ‘ब्रेथ अ‍ॅनालाइजर’ने तपासणी केली असता त्यामध्ये १०९ जण मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आले़ त्यांच्यावर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हनुसार कारवाई करण्यात आली़