शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

तेरा विंधन विहिरी कोरड्या

By admin | Updated: June 28, 2016 00:49 IST

शिवसेनेचे स्टिंग आॅपरेशन : सटाणा नगराध्यक्षांचा दावा ठरला फोल

सटाणा : शहर आज भीषण पाणी टंचाईला सामोरे जात आहे. काही भागात आठ दिवसाआड तर काही भागात थेंबभरही पाणी येत नाही, अशी अवस्था असताना दुसरीकडे मात्र सोळा विंधन विहिरी करून शहराची पाणीटंचाई दूर केल्याचा दावा नगराध्यक्ष करत आहेत. परंतु हा दावा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख शरद शेवाळे यांनी सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनने फोल ठरवला. शिवसेनेच्या या स्टिंगमध्ये तब्बल तेरा विंधन विहिरी कोरड्या ठाक निघाल्या, तर काही ठिकाणी विंधन विहीरच केली नसल्याचे आढळून आले. सटाणा शहरासाठी ठोस पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे शहरवासीयांसाठी पाणीटंचाई ही पाचवीला पूजलेली आहे. शहरात नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पालिकेला महसूलही चांगला मिळतो. परंतु बहुतांश नवीन नागरी वसाहतींपर्यंत पालिकेचे नळ पोहचले पण पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. आजच्या घडीला शहरात आठ दिवसआड पाणी येते, काही ठिकाणी तर येतच नाही, अशी भीषण परिस्थिती असताना टंचाई निवारण करण्यासाठी पालिका प्रशासनाने आमदार निधीमधून सोळा विंधन विहिरींचे काम घेतली होते. दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्षांनी या सोळा विंधन विहिरींना मुबलक पाणी आहे, त्यांना जलपरी बसवून ठिकठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत करून टंचाई दूर केल्याचा दावा माध्यमांद्वारे केला होता. याबाबत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, शहर प्रमुख शरद शेवाळे यांनी सोमवारी स्टिंग आॅपरेशन केले. प्रथम शिवसेनेच्या टीमने मुल्लावाड्यात फेरफटका मारला. त्याठिकाणी एका विंधन विहिरीला पाणी लागले तर दुसरी कोरडी ठाक निघाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. आंबेडकरनगर व अहल्याबाई चौकात तर विंधन विहीर आढळून आली नसल्याचे नागरिकांच्या हवाल्याने सांगितले. सुभाष ततार चौकात तर या टीमला खळबळजनक प्रकार निदर्शनास आला. याठिकाणी दोनशे फुट पर्यंत खोल विंधन विहीर करण्यात आली. मात्र पाणी न लागल्यामुळे नागरिकांनी साडे तीनशे फुटापर्यंत खोल करण्याची मागणी केली त्याला संबंधित ठेकेदाराने नकार देत दीडशे फुटासाठी वर्गणी गोळा करण्याचा पर्याय दिला. त्यानुसार प्रतिकुटुंब पाचशे रु पये गोळा केल्याचे तेथील नागरिक बिंदू शर्मा यांनी सांगितले. मात्र तरी फुपाटेच निघाल्याचे आढळून आले. त्यानंतर भोईगल्ली, सोनारगल्ली, दीपनगर, मराठी शाळा, कचेरीरोड, गणेशनगर येथे सर्वच ठिकाणच्या विंधन विहिरीत फुपाटेच निघाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. सुकेडनाला आदिवासी वस्तीत तर अनेकवेळा विंधन विहिरी केल्या परंतु त्या बिले काढण्यापुरत्याच. विंधन विहीर होते मात्र खाली वाळू असल्याचे कारण सांगून आम्हाला तहानलेलेच ठेवल्याचे आदिवासी बांधवानी सांगितले. सेनेच्या टीमने सोमवारी दिवसभर केलेल्या या स्टिंग मुळे पालिका प्रशासनाचा भंडा फोड होऊन नगराध्यक्षांचा दावा फोल ठरवला आहे. (वार्ताहर)