सिन्नर : वाजे मळ्यात आतापर्यंत तीन बिबटे पकडले, वनविभागाला यशसिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात गेल्या आठ दिवसांत तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात गेल्या काही दिवसांपासून आमदार राजाभाऊ वाजे व मविप्रचे संचालक हेमंत वाजे यांच्या शेतात बिबट्याच्या जोडीसह दोन बछड्यांचा वावर असल्याने अनेकांनी पाहिले होते. त्यामुळे या भागात वनविभागाने हेमंत वाजे यांच्या आवळ्याच्या बागेत पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात भक्ष्य ठेवण्यात आले होते. गेल्या शुक्रवारी पहाटे या पिंजºयात एक वर्षाचा बछडा अलगद अडकला. त्यानंतर उर्वरित बछडा व बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने आवळ्याच्या बागेत दुसऱ्यांदा पिंजरा लावला होता.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजºयात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या अडकला होता; मात्र बछड्याच्या विरहाने बिबट्याने पिंजरा तोडूनत्यातून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. डरकाळ्या फोडत तो पूर्ण ताकदीनिशी पिंजºयाचा पत्रा वाकवून बाहेर पडला. वनउद्यानात रवानगीशनिवारी मध्यरात्री अथवा रविवारी पहाटेच्या सुमारास या पिंजºयात चवताळलेली बिबट्या मादी जेरबंद झाली. सकाळी बिबट्याने डरकाळ्या फोडल्यानंतर स्थानिक शेतकºयांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. त्यामुळे तिसºयांदा लावलेल्या पिंजºयात बिबट्या मादीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. त्यानंतर पुन्हा याठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. त्यात गुरुवारी पहाटे तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला. वनविभागाच्या कर्मचाºयांनी बिबट्याची रवानगी मोहदरी वनउद्यानात केली.
आठवडाभरात तिसरा बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:51 IST
सिन्नर : वाजे मळ्यात आतापर्यंत तीन बिबटे पकडले, वनविभागाला यशसिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात गेल्या आठ दिवसांत तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.
आठवडाभरात तिसरा बिबट्या जेरबंद
ठळक मुद्दे वनविभागाच्या कर्मचाºयांनी बिबट्याची रवानगी मोहदरी वनउद्यानात केली.