शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यास पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:37 IST

मुंबईच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचे गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरून नेणाºया एका सोनसाखळी चोरट्यास उपनगर पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडले, तर पळून गेलेल्या दुसºया सराईत गुन्हेगाराचा पोलीस कसून शोध घेत आहे. मुंबई पोलीस कर्मचाºयाची पत्नी संजीवनी मिलिंद देशमुख या शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रधाननगर येथे राहाणाºया बहिणीच्या घरी जात असताना बंगल्याजवळच दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले.

नाशिकरोड : मुंबईच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचे गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरून नेणाºया एका सोनसाखळी चोरट्यास उपनगर पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडले, तर पळून गेलेल्या दुसºया सराईत गुन्हेगाराचा पोलीस कसून शोध घेत आहे .मुंबई पोलीस कर्मचाºयाची पत्नी संजीवनी मिलिंद देशमुख या शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रधाननगर येथे राहाणाºया बहिणीच्या घरी जात असताना बंगल्याजवळच दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले. घटना स्थळापासून काही अंतरावर उभे असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी सदर चैन स्नॅचिंगची घटना त्वरित उपनगर पोलिसांना फोनवरून कळविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, अशोक वाजे, सुखदेव मगर, अरिफ शेख, राहुल खांडबहाले आदी पोलीस व्हॅनमधून प्रधाननगर येथे पोहचले. देशमुख यांनी एका चोरट्याने हेल्मेट घातले असून दुसºया चोरट्याच्या डोक्याचे काही केस गोल्डन रंगाचे असल्याचे सांगितले. रायते व इतर कर्मचारी चोरट्यांचा शोध घेत आर्टिलरी सेंटर रोडकडे वळाले. खोले मळा माहेश्वरी भवन समोर रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन उभे असलेले दोघे चोरटे पोलीस गाडीचा सायरन ऐकल्याने पळू लागताच त्यांच्या दुचाकीने रस्त्यावरील बॅरिकेट््सला धडक दिल्याने ते खाली पडले. एकजण दुचाकी घेऊन पळून गेला, तर दुसरा चोरटा बबलू रामधर यादव (२२) रा. देवळालीगाव हा रस्त्याने पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडले.वर्णनावरून संशयितांना ओळखलेहवालदार अशोक वाजे यांनी शनिवारी दुपारी श्री घंटी म्हसोबा मंदिराजवळ उभ्या असलेल्या सागर म्हस्के व त्यांच्या साथीदाराला हटकले असता ते पळून गेले. वाजे यांनी त्यांचा पाठलाग सुद्धा केला होता. म्हस्के यांच्या सोबत असलेल्या युवकाने डोक्याचे केस काही प्रमाणात गोल्डन केल्याचे वाजे यांनी बघितले होते. सायंकाळी मंगळसूत्र चोरून गेल्यानंतर देशमुख यांनी संशयिताचे केलेल्या वर्णनानुसार हवाल दार अशोक वाजे यांनी खोले मळा येथे दोघा संशयितांना ओळखून पाठलाग केल्याने एकास पकडले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय