शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
2
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
3
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
4
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
5
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
6
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
7
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
8
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
9
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
10
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
11
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
12
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
15
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
16
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
17
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
18
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
19
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
20
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:27 AM

लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले दागिने व रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना खुटवडनगर व काठे गल्ली परिसरात घडली आहे़ चोरट्यांनी या दोन घटनांमध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़

नाशिक : लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले दागिने व रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना खुटवडनगर व काठे गल्ली परिसरात घडली आहे़ चोरट्यांनी या दोन घटनांमध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामा त्र्यंबक भागवत (६४, रा़ रो-हाउस नंबर ३, साईदृष्टी अपार्टमेंट, सीटू भवनच्या मागे, खुटवडनगर, नाशिक) यांनी लक्ष्मीपूजनासाठी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ९० हजारांचा ऐवज घरातील हॉलमध्ये पूजेच्या पाटावर ठेवला होता़ पूजा आटोपल्यानंतर रात्री बारा वाजता भागवत कुटुंबीय झोपी गेले़ मध्यरात्रीनंतर पावणे चार वाजेच्या सुमारास भागवत यांना जाग आली असता त्यांना पूजेसाठी ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याचे तसेच घराची खिडकी उघडी असल्याचे दिसले़ त्यांनी तत्काळ घरातील व्यक्तींना दागिन्यांबाबत विचारणा केल्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले़  हॉलमधील पूजेच्या पाटावर १५ ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस असे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली होती़ या प्रकरणी भागवत यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेली रोख रक्कम व घरातील एलईडी टीव्ही चोरट्यांनी चोरून नेल्याची दुसरी घटना मुंबई नाक्यावरल रुद्रकार मॉलमध्ये घडली़ प्रिया राकेश मुनशेट्टीवार (३०, काठे गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कार मॉलच्या कंपाउंडमधील ओपन पत्र्याच्या शेडमधील कॅबिनमध्ये घुसून पूजेसाठी ठेवलेली रोख रक्कम व २४ इंची एलईडी टीव्ही असा ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़तीस हजारांची फसवणूकएटीएम अकाउंट व एसबीआय क्रेडिट कार्डची माहिती घेऊन एका इसमाची तीस हजार रुपयांना फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी (दि़२०) घडली़ ओझर रोडवरील साकार ड्रिम्स अपार्टमधील रहिवासी वैभव खैरनार यांना शुक्रवारी अकरा वाजेच्या सुमारास एका संशयिताने ९८९१३१७७०२ या क्रमांकाच्या मोबाइलवरून फोन केला़ या इसमाने टुरिस्ट पॅकेज, एलईडी टीव्ही व कॅशबॅक योजनांच्या नावाखाली खैरनार यांच्या एटीएम अकाउंट नंबरची तसेच एसबीआय क्रेडिट कार्डची माहिती घेतली़ यानंतर या दोन्ही अकाउंटमधून २८ हजार ९४५ रुपये परस्पर काढून घेतले़