शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

देवळा येथे चोरट्यांनी दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:24 IST

अज्ञात चोरट्याने मंगळवारी पहाटेच्या वेळी शहरातील चार दुकानांचे शटर तोडले, तर तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानात चोरी करताना चोर सीसीटीव्हीत कैद झाला असून, देवळा पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे. शहरासह तालुक्यात चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .

देवळा : अज्ञात चोरट्याने मंगळवारी पहाटेच्या वेळी शहरातील चार दुकानांचे शटर तोडले, तर तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानात चोरी करताना चोर सीसीटीव्हीत कैद झाला असून, देवळा पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे. शहरासह तालुक्यात चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .मंगळवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास देवळा- कळवण रस्त्यावरील देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हिरे आॅटो, आनंद अ‍ॅग्रो, ओमश्री हाडर्वेर, बीव्हीके गोडाऊन आदी दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने हजारो रूपये किमतीचे सामान व रोकड चोरून नेली. ह्या दुकानातील सीसीटीव्हीत चोरीकरत असतानाचे फुटेज मिळाले असून, पोलीस चोरट्याचा शोध घेण्यात येत आहेत.शहरात दुचाकी चोरीला जाण्याच्या तसेच घरफोडी व भुरट्या चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मागणीदेवळा शहराला पाच वर्षांपूर्वी तंटामुक्त गावाचा शासनाकडून मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून मोठा गाजावाजा करीत शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती. यामुळे पोलीस यंत्रणा सजग असल्याचे व शहरातील रोडरोमिओंना तसेच चोरीच्या घटनांना आळा बसू लागल्याचे चित्र सुरूवातीला दिसू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु कालांतराने सीसीटीव्ही यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर गुन्हेगारांचे फावले. शहरात नवीन सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी