शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

चोर पल्सरवर; पोलीस सायकलवर

By admin | Updated: November 17, 2015 23:58 IST

चोर पल्सरवर; पोलीस सायकलवर

नाशिक : कोणत्याही गोष्टीचे विशिष्ट प्रयोजन जसे असते, तसेच ती गोष्ट कधी करायची, कोणी करायची यावरही बरेचसे अवलंबून असते. म्हणजे सांगायचा मतलब इतकाच की, लहानपणी वेळेत शाळा गाठणे असो की, शाळेविषयी गोडी वाटावी म्हणून आई-बाबांनी सायकल घेऊन द्यावी व नवीन सायकल हाती पडताच, अगदी हाकेचे अंतर कापण्यासाठी का होईना सायकलचा मुक्त वापर केला जावा हे नवशिक्या मुलांकडूनच अपेक्षित आहे. आता काळानुरूप परिस्थिती बदलली. मिसूरडेही न फुटलेल्यांना मोपेड, बाइकची ओढ सुटत नाही, किंबहुना स्व-वजनापेक्षा न तोलवल्या जाणाऱ्या वाहनांचा वारेमाप वापर सुरू असताना, पुन्हा त्याच न पळणाऱ्या सायकलीचा आग्रह कोण बरे धरेल? पण नाही, अजूनही सायकलीचा फक्त आर्थिक परिस्थितीशी सामना करणाऱ्यांकडून जसा वाहन म्हणून वापर केला जातो, तसा तो आर्थिक सुबत्तेत ओतप्रोत न्हाऊन निघालेल्यांकडूनही हौस वा शारीरिक तंदुरुस्तीसाठी वापर केला जातो. याचाच अर्थ सायकलीचा वापर एक तर लहानपणाची हौस आणि दुसरे म्हणजे आर्थिक परिस्थितीशी निगडित राहिलेला आहे. परंतु याच सायकलीचा वापर आता गुन्हेगार शोध मोहिमेसाठी करण्याचा निर्णय पोलीस खात्याने घेऊन लगोलग त्याची अंमलबजावणीही सुरू केली. घरात अडगळीत पडलेल्या सायकलींची डागडुजी करण्यात आली, तर सायकलीशी लहानपणानंतर कधीच संबंध न आलेल्यांनी सरकारचा फतवा म्हणून सायकली विकत (?) घेण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे पुन्हा एकदा आता सायकलींना चांगले दिवस येण्याची शक्यता जशी नाकारता येत नाही, तसेच सध्याच्या ढेरपोट्या पोलिसांचे ‘स्मार्टनेस’मध्ये रूपांतर होण्याचे दिवसही फार दूर नाही, असा आशावाद बाळगण्यास हरकत नसावी; पण सायकलीचा संबंध आता तेवढ्या पुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर गल्ली-बोळ अगदीच एका व्यक्तीचाच शिरकाव होऊ शकेल, अशा चिंचोळ्या रस्त्यात जीव मुठीत घेऊन रहिवास करणाऱ्या नागरिकांच्या संरक्षणासाठी केला जाणार आहे. एरव्ही गुन्हेगार फक्त शहरातील प्रमुख रस्त्यावरून आणि तेही आलिशान चारचाकी व भरधाव धावणाऱ्या दुचाकीचाच वापर करतात म्हणून त्यांच्या अटकावासाठी दिवसा व रात्री नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांचाच बहुधा हळूहळू भ्रमनिरास होत असावा, कारण दोन-चार तास सलग ऊन, वारा, पावसात उभे राहूनही नाकाबंदीत ‘सावज’ गवसत नाही म्हटल्यावर ‘सावजा’ने मुख्य रस्त्यावरून गल्ली-बोळाकडे केंद्र हलविले असावे किंवा पोलीस नेहमीच मुख्य रस्त्यावरच शोध घेतात म्हणून चौर्यक्रमासाठी बंगले, कॉलन्या, सोसायट्या सोडून दाट वस्तीची चोरट्यांनी निवड केल्याचा सुगावा पोलिसांना लागला असावा. त्यामुळे अगोदरच पळण्यात पटाईत व उड्या मारण्यात चपळ असलेल्या चोरट्यांचा गल्ली-बोळात शोध घेण्यासाठी सायकलीशिवाय पर्यायच नसल्याचा साक्षात्कार पोलीस यंत्रणेला झाला व त्यावर उपाय म्हणून फक्त सायकल हाच पर्याय पोलीस प्रमुखासमोर उभा ठाकला आहे. परिणामी एरव्ही पोलीस वाहनाच्या काचा खाली न करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका दिवसात जमिनीवर येत सायकलीचा शहरभर वापर करणाऱ्या छबी सर्वत्र झळकल्या आहेत. सारेच सायकलीने रस्त्यावर उतरल्यानंतर किती गुन्हेगार हाती आले वा सायकलीपेक्षाही वेगाने पळत फरार झाले हे समजू शकले नाही; मात्र स्कॉटलॅँड यार्ड पोलिसांशी तुलना करीत स्वत:ची डिमडीमकी वाजवून घेणाऱ्या पोलिसांची सायकल गुन्हेगाराच्या आधुनिक वाहनापेक्षा वेगाने पळू शकेल काय असा अगदीच सामान्यातील सामान्य व्यक्तीला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणालाच सापडलेले नाही.