शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

शटर तोडून चोरी करण्यास दुकानामध्ये चोर शिरला अन् अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 21:56 IST

घरफोडी करणारे दोघे मध्यरात्रीच्या सुमारास इंदिरानगर भागातील एका शालेय साहित्यविक्री करणाºया दुकानाचे शटर उचकटून आत शिरले

ठळक मुद्देदुकानमालकासह पोलिसांना सदर बाब कळविली दुकानामध्ये चोरट्यांनी शटर तोडून प्रवेश केला. दोघा चोरट्यांपैकी एकाने अडीच ते तीन हजार रुपयांचे साहित्य घेऊन पोबारा केलाचा दुसरा साथीदार दुकानात अडकून राहिलापोलिसांनी तत्काळ त्यास बेड्या ठोकल्या

इंदिरानगर : घरफोडी करणारे दोघे मध्यरात्रीच्या सुमारास इंदिरानगर भागातील एका शालेय साहित्यविक्री करणाºया दुकानाचे शटर उचकटून आत शिरले; मात्र दुकानामधून दोघांपैकी एक चोर पळून जाण्यात यशस्वी झाला, तर दुसºयाला मात्र पहाट उजाडेपर्यंत बाहेर पडण्याचा ‘मार्ग’ मोकळा झाला नाही. त्यामुळे नागरिकांना तो सहज सापडला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बापू बंगला या मुख्य चौकामध्ये असलेल्या विद्यालक्ष्मी स्टेशनर्स या दुकानामध्ये चोरट्यांनी शटर तोडून प्रवेश केला. दोघा चोरट्यांपैकी एकाने अडीच ते तीन हजार रुपयांचे साहित्य घेऊन पोबारा केला; मात्र त्याचा दुसरा साथीदार दुकानात अडकून राहिला. त्याला बाहेर पडणे मुश्कील झाले. त्याचे पहाटेपर्यंत पळून जाण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले अखेर सकाळी दुकानाचे शटर तोडल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी दुकानमालकासह पोलिसांना सदर बाब कळविली. यावेळी पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी आले असता त्यांनी शटर उघडले तेव्हा दुकानामध्येच त्यांना चोरटा मिळून आला. पोलिसांनी तत्काळ त्यास बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एक साथीदार साहित्य घेऊन पळून गेल्याची कबुली दिली आहे. संपूर्ण दिवस उलटूनही पोलिसांना त्याच्या दुसºया साथीदाराचा थांगपत्ता लागला नाही.