शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ते’ लोक आज लोकशाहीपुढील मोठे आव्हान - अ‍ॅड. असीम सरोदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 21:52 IST

नाशिक : आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी दुर्देवाने भावना दुखवून घेणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. क्षुल्लक कारणांवरुन व टीकेवरुन आजकाल विविध जाती, धर्म, पंथ, समाजाच्या भावना दुखावल्या जातात आणि निषेध मोर्चे रस्त्यावर येतात; मात्र हे ‘हळव्या’ भावनांचे लोकच लोकशाहीपुढील आजचे सर्वात मोठे आव्हान आहे, असे मत अ‍ॅड. असीम सरोदे ...

ठळक मुद्देपत्रकारिता-पत्रकारांवर अन्यायच!भोगी लोकांच्या हाती सत्ता गेली माध्यामांकडे समाजाच्या संवेदना आणि विचार जागविण्याची ताकद

नाशिक : आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी दुर्देवाने भावना दुखवून घेणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. क्षुल्लक कारणांवरुन व टीकेवरुन आजकाल विविध जाती, धर्म, पंथ, समाजाच्या भावना दुखावल्या जातात आणि निषेध मोर्चे रस्त्यावर येतात; मात्र हे ‘हळव्या’ भावनांचे लोकच लोकशाहीपुढील आजचे सर्वात मोठे आव्हान आहे, असे मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.गोदाकाठावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे मंगळवारी (दि.१५) सरोदे यांनी चौदावे पुष्प गुंफले. ‘माध्यमांचे स्वातंत्र्य व लोकशाहीचा जीवंतपणा’ या विषयावर बोलताना सरोदे म्हणाले, आजची परिस्थिती बघता पत्रकारांवर प्रचंड दबाव चौहोबाजूंनी टाकला जात आहे. त्यामुळे पत्रकारिता तणावपुर्ण वातावरणात वावरते आहे. सत्ताधाºयांच्या दावणीला जणू पत्रकारिता बांधली गेली आहे की काय, अशी शंका समाज उपस्थित करु लागला आहे, हे दुर्देवाने नमुद करावेसे वाटते. टीका पचवून घेणाºयांची संख्या अत्यल्प झाल्यामुळे पत्रकारितेला सातत्याने मानहाणीचा दावा आणि निषेधाच्या धमक्यांना सामोरे जावे लागत आहे; मात्र पत्रकारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मानहाणीचा कायदा हा जुना झाला असून या कायद्यान्वये ज्यांची बदनामी झाली त्यांना सर्वप्रथम न्यायालयात त्यांची समाजात काय पत होती व त्यास काही हानी पोहचली हे सिध्द करावे लागते. माध्यमांनी सकारात्मकतेतून लोकशाही मुल्यांची जोपासना करत सर्वसामान्य व दिनदुबळ्यांच्या पाठीराखे होऊन सत्याची बाजू समाजापुढे आणण्याचे कर्तव्य पार पाडावे. कारण माध्यामांकडे समाजाच्या संवेदना आणि विचार जागविण्याची ताकद आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पत्रकारांनी पत्रकारिता अधिकाधिक पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न केल्यास मानवी जबाबदारी पार पाडण्यास मदत होईल, असे सरोदे म्हणाले. माध्यमांनी विविध क्षेत्र व राजकिय, प्रशासकिय यंत्रणेमधील ‘अस्वच्छता’ समाजापुढे आणण्याचे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. पत्रकारांनी मानहाणीच्या धमक्यांनी घाबरण्याची गरज नाही. न्यायालयाच्या निकालाच्या विश्लेषण करण्याचाही अधिकार सर्वसामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत सर्वांना आहे, असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.--पत्रकारिता-पत्रकारांवर अन्यायच!आजची स्थिती बघता भोगी लोकांच्या हाती सत्ता गेलेली असून वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या चालविणा-यांकडूनही पत्रकारांवर अन्यायच केला जात आहे. आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्याकडे या मंडळींचा कल आहे; मात्र पत्रकारांचे वेतनवाढ करत त्यांच्या सोयीसुविधांसाठी खर्च करण्यास कंपन्या धजावत नसल्याची टीकाही त्यांनी केली.-

टॅग्स :Journalistपत्रकारNashikनाशिकadvocateवकिल