शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने दगावलेल्यांवर ‘ते’ करतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:21 IST

मालेगाव : कोरोनाने दगावलेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे नातलग व स्वकीयही पाठ फिरवित असताना शहरातील कोरोनायोद्धा दत्तात्रय जाधव हे कोविड-१९ने दगावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी आतापर्यंत २६ जणांवर अंत्यसंस्कार करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.

ठळक मुद्देमृताचे नातलग फोनद्वारे संपर्क साधून अंत्यसंस्काराची गळ घालतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : कोरोनाने दगावलेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे नातलग व स्वकीयही पाठ फिरवित असताना शहरातील कोरोनायोद्धा दत्तात्रय जाधव हे कोविड-१९ने दगावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी आतापर्यंत २६ जणांवर अंत्यसंस्कार करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी कुटुंबाकडून प्रयत्न केले जात असले तरी त्यानंतर बाधिताला येणारे अनुभव कटू असतात. कोरोनावर मात करून अनेकजण घरीही परतले आहेत, तर दुर्दैवाने काहींचा यात मृत्यू झाला आहे. मृतांवर शहरातील कोरोनायोद्धा दत्तात्रय जाधव अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांना बाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रात्री-अपरात्री रुग्णवाहिकेचा चालक किंवा मृताचे नातलग फोनद्वारे संपर्क साधून अंत्यसंस्काराची गळ घालतात. जाधव कोणताही संकोच न बाळगत तत्काळ स्मशानभूमीत दाखल होत मृताचा अंत्यविधी करतात.मूळचे सटाणा येथील रहिवासी असलेले जाधव यांचे वडील जगन्नाथ जाधव पोलीस खात्यात नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर ते कुटुंबीयांसमवेत मालेगावी स्थायिक झाले. दत्तात्रय जाधव १५ वर्षांपासून समाजकार्य करीत आहेत. सध्या पीपीई किट घालून ते अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडतात. यावेळी त्यांना कुटुंबीयाकडून विरोध होतो; मात्र ते त्यांची समजूत काढून आवश्यक काळजी घेत हे कार्य करतात. कोरोनायोद्धा म्हणून त्यांच्या कार्याचा अनेक संघटनांच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य