शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

...त्यांनी केली वंचितांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:03 IST

आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाऱ्या भावनेतून ‘त्यांनी’ केली वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड... दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडत साजरी होते.

नाशिक : आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाऱ्या भावनेतून ‘त्यांनी’ केली वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड... दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडत साजरी होते. मात्र त्यांनाही काही क्षण गोड-धोड खाऊन, लखलखाट जाणवावा यासाठी शहरातील काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत वेगवेगळे उपक्रम राबविले होते.दिवाळी म्हटली की गोड-धोड पदार्थ, नवीन कपडे, मिठाई, लखलखाट, फटाके हे सर्व डोळ्यासमारे येत असते. मात्र आपल्याच सभोवताली अनेक वंचित, गरीब, होतकरु लोक असतात की त्यांना एकवेळचे जेवणासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे दिवाळी साजरे करणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असते. त्यांनीही वाटत असते की आपणही काहीतरी गोड खावे, नवीन कपडे घालावे मात्र त्यांच्या नशिबी नेहमीच अंधार असतो. यामुळेच शहरातील काही सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकीचे भान जपत अशा गरजुंना कपडे, मिठाईचे वाटप केले. शहरातील ‘मानव उत्थान मंच’, ‘रॉबिनहुड आर्मी’आदींनी गरिबांच्या जीवनात प्रकाशमान करण्याचा छोटासा प्रयत्न केला.‘शेअरिंग जॉय मोहिमे’तूनत्यांनी केले कपड्यांचे वाटपदेणाºयाने देत जावे, घेणाºयाने घेत जावे या उक्तीप्रमाणेच मानव उत्थान मंच सलग नऊ वर्षांपासून ‘शेअरिंग जॉय’ उपक्र म राबवून अनेक लोकांच्या चेहºयावरच्या हास्याचे कारण बनत आहे. सणोत्सवाच्या दिवशी कामावर असलेल्या गरीब व होतकरु लोकांना तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घेण्यात आला. यासाठी संस्थेतर्फे ६ गट तयार करण्यात आले होते. त्र्यंबकरोड, पेठरोड, नाशिकरोड, घोटीरोड, दिंडरीरोड भागात हा उपक्रम राबविण्यात आला. सामनगाव येथील ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात यादिवशी सुमारे ७० ते ७५ ज्येष्ठ महिला व पुरुषांना साडी, कुर्ता, बेडशिट, काजू, बदाम, मनुके, व खुजराचा बॉक्स तसेच एक भेटवस्तु देण्यात आली. तर इतर मार्गांवरील गरीब व होतकरु गरजुंना भेटवस्तू व ड्रायफ्रुटचा बॉक्स देण्यात आला. या उपक्रमासाठी १.५ लाख रुपये जमा करुन यातून सुमारे २५० गरिबांना भेटवस्तू देण्यात येणार आल्या.रॉबिनहूड आर्मीने जपलीसामाजिक बांधिलकीजगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था म्हणून ओळखली जाणारी रॉबिनहूड आर्मी आज नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. दरवर्षी दिवाळीनिमित्त संस्थेकडून कपडे व फराळ वाटप करण्यात येते. समाजातील लोकांना आवाहन करुन यावर्षी त्यांनी देणगी जमा करत वंचितांची दिवाळी साजरी करण्याचा मानस केला होता. याप्रमाणे आर्मीकडे मोठ्या प्रमाणावर फराळ, मिठाई, कपडे जमा झाले होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच संस्थेमार्फत शहरातील विविध ठिकाणी जात गरीब,गरजू लोकांसाठी मिठाई, फराळ, व कपडे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा रुग्णालय, आदिवासी भागातील टाकळी गावात जाऊन तेथील गरजूंना कपडे व फराळ वाटप केले. यावेळी संस्थेतर्फे एकून ५०० मिठाईचे बॉक्स फराळ वाटप करण्यात आले. तसेच सुमारे १ हजार व्यक्तिंना नवीन कपड्याचे वाटप करण्यात आले. तसेच दिवाळीच्या दिवशी कर्तव्य बजावणारे शहरातील पोलिस, सफाई कर्मचारी यांनादेखील मिठाईचे वाटप करण्यात आले.गेल्या नऊ वर्षांपासुन संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी यात मोठी भर पडली असून समाजातील अनेक व्यक्तिंनी यासाठी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे आमचा ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम साध्य होऊ शकला. यामुळे ज्यांनी या उपक्रमासाठी हातभार लावला त्यांचे आम्ही आभारी आहोत.- जगबीर सिंग, अध्यक्ष, मानव उत्थान मंचरॉबिनहूड आर्मी ही भारतातील सर्वच शहरांत कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीनिमित्त संस्थेतर्फे मिठाई व फराळ वाटप करण्यात येते. यानुसार नाशिकमध्येही गरजूंना दिवाळीनिमित्त फराळ, मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी समाजातील लोकांची मोठी मदत लाभली. यामुळे त्यांचे आम्ही सदैव ऋणी राहू- अभिजित कासार, समन्वयक, रॉबिनहूड आर्मी

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिक