शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ देतात स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: January 16, 2017 01:27 IST

७२ वर्षांचा तरूण : ग्रामीण भागात सायकलद्वारे प्रवास

स्वप्निल जोशी  नाशिकसेवानिवृत्तीनंतर नातवंडांमध्ये रमत, हास्यक्लब किंवा देवदर्शन करण्यात वेळ न दवडता नाशिकमधील प्रकाश पिंगळे (वय ७२) हा तरुण ग्रामीण भागासह आदिवासी भागातील नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्याचे काम अविरतपणे करत आहे. विशेष म्हणजे या वयातही त्यांचा प्रवास सायकलवर सुरू आहे. युवकांनाही लाजवेल अशी कामगिरी करणाऱ्या पिंगळे यांची ही कहाणी.सहकारी कृषी आणि ग्रामविकास (भूविकास) बँकेतून विभागीय अधिकारी म्हणून २००३ साली सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रकाश पिंगळे यांनी गंगापूररोड येथील निर्मलग्राम निर्माण केंद्रात स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. स्वयंसेवक म्हणून काम करताना पिंगळे यांनी श्रीकांत नावरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शौचालय, घनकचरा आणि सांडपाणी याबाबत ग्रामीण तसेच आदिवासी भागात स्वच्छतेसाठी प्रशिक्षण आणि पडताळणी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. जव्हार, मोखाडा, वाडा, तलसारी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी अशा भागांमध्ये जाऊन शाळेतील मुलांना प्रशिक्षण देतानाच मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यातही पिंगळे यांचा महत्त्वाचा वाटा आहे.देशभरात साजऱ्या होणाऱ्या ‘राष्ट्रीय युवा दिनी’ प्रकाश पिंगळे यांनी सेवानिवृत्त नागरिकांनी नोकरीतून बाहेर पडल्यानंतर कुटुंबातूनही सेवानिवृत्त होऊन आपल्या पुढच्या पिढीकडे जबाबदारी सोपविण्याचे आवाहन केले. तसेच आजच्या युवकांनी साधी जीवनशैली आत्मसात करून नियमित व्यायाम करणे, कुठल्याही कामाची लाज न बाळगता घरातील सगळ्या कामात मदत करण्याचे आवाहन केले आहे.