शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी उकळणारे ते ‘तिघे’ फरारच

By admin | Updated: December 24, 2014 00:04 IST

खंडणी उकळणारे ते ‘तिघे’ फरारच

नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवर दवाखाना असलेल्या डॉक्टरांना तुमच्याकडे पालिकेची परवानगी नाही तसेच बोगस डॉक्टर असल्याची बातमी दाखवून बदनामी करण्याची धमकी देऊन पन्नास हजारांची खंडणी मागणारे आरोग्य विभागाचे तोतया कर्मचारी संशयित महेश वाघ, रवि कावते, आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलचा तोतया पत्रकार महेश घनदाट या तिघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, हे तिघेही फरार असून, पोलीस त्यांचा शोघ घेत आहेत़साई क्लिनिकचे डॉ़ अमोल वाजे यांच्याकडे सोमवारी दुपारी संशयित भारत घनदाट हा महेश वाघला घेऊन तपासणीसाठी आला़ यानंतर लिहून दिलेली औषधे घेण्यासाठी बाहेर पडलेले हे दोघे थोड्याच वेळात रवि कावते यास व्हिडीओ कॅमेऱ्यासह घेऊन दवाखान्यात आले़ यातील दोघांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातून आल्याचे तर भारत घनदाट याने आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलचा पत्रकार असल्याचे सांगितले़ यानंतर दोघांनी वाजे यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करून ते तपासून पाहत तुम्ही बोगस डॉक्टर आहात, असे सांगितले़तुमच्याकडे महापालिकेचा परवानगी नाही असे सांगत महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ गायकवाड यांना फोनही लावून त्यांच्याशी बोलणेही करून दिले़ यातील महेश वाघ व भारत घनदाट याने पत्रकार असल्याचे सांगून बदनामी टाळण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली़ डॉ़ वाजे यांनी नगरसेवक सचिन भोर व तानाजी जायभावे यांना फोन केल्यांनतर या तिघांचाही खोटारडेपणा उघड झाला़ त्यांना ताब्यात घेतले असता डॉक्टर गायकवाड यांच्या सांगण्यानुसार काम करीत असून, पाटीलनगर येथील डॉ़ज्योती पवार, राणेनगर येथील डॉ़उषा शिरुडे, सिंहस्थनगर येथील डॉ़विजय काकडे, डॉ़ दीपाली देशमुख यांच्याकडून पैसे घेऊन त्यातील काही रक्कम कमिशन म्हणून दिल्याचे सांगितले़याबाबत मनपा आयुक्तांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगितले असता भारत घनदाट व रवि कावते हे दोघे फरार झाले़ दरम्यान, या प्रकरणी संशयित भारत घनदाट, रवि कावत व महेश वाघ या तिघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ (प्रतिनिधी)