शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

ही वाहनतळाची की कोंडीची ठिकाणे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:55 IST

शहरातील वाहनतळांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने शहरात अनेक भागात रस्त्याच्या कडेला वाहनतळ उभारून स्मार्ट पार्किंग सुरू केले आहे. त्यातील तेरा ठिकाणांचेच अधिकृत स्पॉट घोषित केले असले तरी अनेक ठिकाणी रस्ते अत्यंत रहदारीचे तसेच काही रस्ते तर तुलनेत अरुंद असून, अशावेळी येथे मोटारी उभ्या करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी अरुंद रस्तेमग बेकायदेशीर पार्किंग काय वाईट होती ?

नाशिक : शहरातील वाहनतळांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने शहरात अनेक भागात रस्त्याच्या कडेला वाहनतळ उभारून स्मार्ट पार्किंग सुरू केले आहे. त्यातील तेरा ठिकाणांचेच अधिकृत स्पॉट घोषित केले असले तरी अनेक ठिकाणी रस्ते अत्यंत रहदारीचे तसेच काही रस्ते तर तुलनेत अरुंद असून, अशावेळी येथे मोटारी उभ्या करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर ठरण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या काही सदोष जागांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यापेक्षा वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.शहरात पुरेशी वाहनतळाची जागा कुठेही नाही त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी किंवा चारचाकी मोटार लावत असल्याने वाहतुकीची कोंडी होते, अशी शासकीय यंत्रणांची तक्रार असते. त्यावर मात्रा म्हणून वाहने उचलेगिरीचा धंदा सुरू करण्यात आला असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आता स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या कडेला वाहने लावण्याचा प्रकार आॅन स्ट्रीट पार्किंग अंतर्गत सुरू करण्यात आला आहे.एकुण २८ ठिकाणे निवडण्यात आली असून, त्यातील तेरा जागांवर स्मार्ट सिटी कंपनीने स्मार्ट पार्किंग सुरू केले आहे. त्यातील अनेक रस्ते हे अत्यंत रहदारीचे आहेत. नेहरू उद्यानालगत दुतर्फा मोटारी उभ्या करण्याची सोय आहे, मात्र उद्यान त्याबाहेरील अतिक्रमण यामुळे आधीच गर्दी झाली असताना तेथे मोटारी उभ्या केल्याने वळणावर रस्ता अधिक अरुंद होतो. विशेषत: नामको बॅँकेच्या जवळ एक बस जात असली तरी तेथे वाहतूक ठप्प होत असताना तेथे वाहनतळ हे डोकेदुखीच ठरण्याची शक्यता आहे.सिटी सेंटर मॉलच्या बाहेरील वाहनतळ तर आणखी गैरसोयीचे आहे. मुळातच मॉलमध्ये वाहनतळ असूनदेखील रस्त्यावर वाहने उभी केली जातात आणि आता त्याला अधिकृत करण्यात आले आहेत. येथे मॉल, मंदिर, अनेक हॉटेल्स आणि दोन मंगल कार्यालये आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असताना आता मोटारी उभ्या करण्यास मुक्त परवाना देण्यात आल्याने अडचण होणार आहे. जेहान सर्कल, कॅनडा कॉर्नर, थत्तेनगर अशा अनेक जागा निवडताना त्याचा व्यवहार्य विचार करण्यात आलेला नाही. याठिकाणी यापूर्वी वाहने उभी केली की वाहतुकीला अडथळा होत असल्याने कारवाई केली जात होती, मग आता अडथळा होणार नाही काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.वाहनतळ व क्षमताकुलकर्णी गार्डन- २६४कॅनडा कॉर्नर बीएसएनएल आॅफिस- ६६४ज्योती स्टोअर्स गंगापूर नाका- २४०४प्रमोद महाजन गार्डन- ८३४गंगापूर नाका ते जेहान सर्कल- ५९३४जेहान सर्कल ते गुरु जी रुग्णालय- १६५४कॅनडा कॉर्नर ते विसेमळा- ११६४जेहान सर्कल ते एबीबी सर्कल- ७८७४गुरु जी रु ग्णालय ते पाइपलाइनरोड- ७९४मोडक पॉइंट ते खडकाळीरोड- ७८४थत्तेनगर (दोन्ही बाजूला)- १६४४शरद पेट्रोलिअम ते वेस्टसाईड- २१७४शालिमार ते नेहरू गार्डन (दोन्ही बाजूला)- १०५

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीParkingपार्किंग