शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवाडा पोलीस ठाण्यात ‘सुभेदारी’ला थारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:11 IST

पोलीस आयुक्तालय हद्दीतील शहराच्या मध्यवर्ती भागाची कायदासुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कोणाच्याही सुभेदारीला थारा दिला जाणार नाही.

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीतील शहराच्या मध्यवर्ती भागाची कायदासुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कोणाच्याही सुभेदारीला थारा दिला जाणार नाही. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी निर्भयपणे मांडाव्या त्यांचा निपटारा केला जाईल, असे आश्वासन नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.सर्व शासकीय कार्यालयांसह रुग्णालय, महाविद्यालय, शाळा, बाजारपेठेसह झोपडपट्टीचा परिसर सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत समाविष्ट आहे. या परिसरात फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याची क बुली देत गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रत्यक्षपणे पोलीस रस्त्यावर राहणार असल्याची ग्वाही सांगळे यांनी यावेळी दिली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी, मोबाइल, वाहनचोरीसह घरफोड्या व हाणामाऱ्यांच्या वाढत्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. यासाठी आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी धोरणात्मक आराखडा आखला असून, त्यांनी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे पोलिसिंग केले जाणार आहे. ठाणे अंमलदारापासून गुन्हे शोध पथकापर्यंतच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्याचे सांगळे म्हणाले.आगामी निवडणूक काळात मोठा ताण या पोलीस ठाण्यावर राहणार आहे. कारण सर्वच नेत्यांच्या महत्त्वाच्या सभा, दौरे, बैठका या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणार असल्याने पोलीस बळाला त्यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी कमी होऊन नागरिकांना निर्भय वातावरण निर्मितीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेNashikनाशिक