शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

मंडपासाठी खड्डे खोदण्यास मनाई

By admin | Updated: July 30, 2016 00:31 IST

मनपाकडून नियमावली : येत्या गणेशोत्सवात अंमलबजावणी

 नाशिक : सार्वजनिक उत्सवप्रसंगी यापुढे रस्त्यांवर मंडप उभारताना सार्वजनिक मंडळे-संस्था यांना कमालीची काळजी घ्यावी लागणार असून मंडप उभारणीसाठी रस्त्यांत खड्डे खोदल्यास प्रति खड्डा ५० हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महापालिकेच्या महासभेने मंडप उभारणीविषयक ठरावाला मान्यता देत त्यासंबंधीची नियमावली तयार केली असून त्याची अंमलबजावणी या गणेशोत्सवापासून होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेनुसार न्यायालयाने सार्वजनिक उत्सव साजरे करताना रहदारीस होणारे अडथळे, ध्वनिप्रदूषण याबाबत उपाययोजना करणारे धोरण आखण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करत एक नियमावली तयार करून ती महासभेच्या मान्यतेसाठी ठेवली होती. आॅक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या महासभेने सदर नियमावलीला मंजुरी दिली असून तसा ठराव समन्वय कक्षाला नुकताच प्राप्त झाला आहे. गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला असल्याने या नियमावलीची अंमलबजावणी त्यावेळी होण्याची शक्यता आहे. नियमावलीनुसार, सिमेंट कॉँक्रीट, डांबरी रस्ते अथवा पॅसेज असलेल्या जागेत मंडपासाठी खोदाई करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मंडप उभारणी करायची असल्यास वाळूने भरलेल्या ड्रमचा वापर करण्याची सूचना करण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत खड्डे खोदण्यास परवानगी नाकारण्यात येणार आहे. खड्डे खोदल्याचे आढळून आल्यास प्रति खड्डा ५० हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. सदर दंड हा खड्ड्याचा आकार १ बाय १ फूट किंवा त्यापेक्षा कमी असल्यास लागणार आहे. परंतु त्यापेक्षा जास्त आकाराच्या खड्ड्याला सरफेस क्षेत्रफळानुसार प्रति चौरस फूट ५० हजार रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे. सदर दंड भरण्यासाठी परवानगी देताना संबंधित अर्जदार किंवा मंडळाकडून शपथपत्र भरून घेतले जाणार आहे. त्यात खड्डे खोदल्यास व दंड न भरल्यास संबंधित व्यक्तीकडून जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे दंड वसूल केला जाणार आहे. उत्सवात बऱ्याच मंडळांकडून विद्युत जोडणी अनधिकृतपणे घेतली जाते. त्यालाही या नियमावलीनुसार चाप येणार असून अनधिकृतपणे जोडणी घेतल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. नव्या नियमावलीत मंडपाची उभारणी नेमकी कोठे आणि कशा पद्धतीने करावी, फूटपाथवर मंडप उभारणी करू नये आणि ध्वनिप्रदूषणाची पातळी किती असावी यासंबंधीही निर्देश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)