शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

खोटे पत्ते देणाऱ्यांंच्या अर्जात दुरुस्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:50 IST

आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांपैकी नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी आॅनलाइन अर्जात खोटे पत्ते व चुकीच्या जन्मतारखा नोंदविल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता.

प्रभाव लोकमतचानाशिक : आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांपैकी नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी आॅनलाइन अर्जात खोटे पत्ते व चुकीच्या जन्मतारखा नोंदविल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. या प्रकाराची प्राथमिक शिक्षण संचालनालयाने गंभीर दखल घेतली असून, दुसरी सोडत जाहीर करण्यापूर्वी ज्या पालकांनी आॅनलाइन अर्जात खोटे पत्ते नोंदवले आहे, अशा पालकांना अर्जात बदल करण्याची संधी नाकारली आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेतील पहिली लॉटरी ८ एप्रिल रोजी काढण्यात आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दुसºया सोडतीपूर्वी पालकांना आॅनलाइन अर्जांमध्ये दुरुस्ती व फेरबदल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यात ज्या पालकांनी अर्ज भरला, परंतु निश्चित (कन्फर्म) केला नाही. त्यांना तो निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ज्या पालकांना लॉटरी लागली नाही. अशा पालकांना त्यांचे गुगल लोकेशन चुकले असल्यास ते दुरु स्त करा येणार आहे. गुगल लोकेशन दुरुस्त केल्यानंतर शाळांची निवड नव्याने करणे आवश्यक आहे. मात्र अशा पालकांना त्यांच्या पाल्यांची जन्मतारीख व नावात बदल करता येणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले असून, ज्या पालकांना पहिल्या फेरीत लॉटरी लागली, परंतु अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकले नाही अशाच पालकांच्या तक्रारीची खात्री पडताळणी समितीने करणे व पालकांची चूक किंवा तांत्रिक चूक असल्यास गुगल लोकेशन व शाळा निवडीत दुरुस्ती करण्याच्या सूचना संचालनालयाने केल्या आहेत.मात्र ज्या पालकांनी घराचे अंतर ३ कि.मी.पेक्षा अधिक असताना जाणीवपूर्वक १ किमीच्या आत दाखविले आहे अशा पालकांना पडताळणी समितीने अपात्र ठरविले आहे. अशा पालकांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व मनपा प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा