शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या गाळेधारकांना दिलासा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:32 IST

महापालिकेच्या गाळेधारकांकडून रेडीरेकनरनुसार पूर्वलक्षी प्रभावाने भाडेवसुली सुरू ठेवल्याने मंगळवारी (दि.२४) राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात आमदार सीमा हिरे व गाळेधारकांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. परंतु, राज्यमंत्र्यांनी गाळेधारकांना कोणताही दिलासा न दिल्याने महापालिकेकडून नवीन दरानेच भाडेवसुली सुरूच राहणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी दिली आहे.

नाशिक : महापालिकेच्या गाळेधारकांकडून रेडीरेकनरनुसार पूर्वलक्षी प्रभावाने भाडेवसुली सुरू ठेवल्याने मंगळवारी (दि.२४) राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात आमदार सीमा हिरे व गाळेधारकांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. परंतु, राज्यमंत्र्यांनी गाळेधारकांना कोणताही दिलासा न दिल्याने महापालिकेकडून नवीन दरानेच भाडेवसुली सुरूच राहणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी दिली आहे.महापालिकेच्या गाळेधारकांचा वाद गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. अडीच महिन्यांपूर्वी राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत गाळेधारकांकडून वसुली थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रेडीरेकनरनुसार महापालिकेच्या गाळेधारकांकडून पूर्वलक्षी प्रभावाने भाडेवसुली सुरू करून व्यापारी संकुलातील ११०० गाळेधारकांना नोटिसा बजावण्याचे आदेश मिळकत विभागाला दिले.  निर्धारित मुदतीत थकबाकी न भरल्यास गाळा जप्तीचा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. त्यामुळे गाळेधारकांचे धाबे दणाणले. त्यानुसार, आमदार सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गाळेधारकांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत गाळेधारकांबाबत नवीन सुधारित नियमावली तयार करण्याचे  काम नगरविकास विभागामार्फत सुरू आहे.   गाळेधारकांची लिलावाची प्रक्रिया राबविलीच जात नसून केवळ भाडेवसुली केली जात असल्याचा दावा प्रशासनाने करत भाडेवसुलीची कार्यवाही सुरूच ठेवली. त्यामुळे मंगळवारी (दि.२४) पुन्हा एकदा आमदार सीमा हिरे यांच्या मध्यस्थीने राज्यमंत्र्यांकडे बैठक झाली. यावेळी महापालिकेचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्यासह गाळेधारकांच्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडली. परंतु, भाडेवसुलीबाबत कोणताही दिलासा तसेच महापालिकेला कोणताही आदेश राज्यमंत्र्यांनी दिला नसल्याचे उपआयुक्त दोरकुळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका