शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये लॉकडाऊन नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:47 IST

निर्बंध कठोर : रुग्ण खाटा वाढविण्याची सूचना नाशिक : कोरोना रुग्णांसाठी सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अर्थचक्र सुरू ठेवण्याला प्राधान्य द्यावे लागणार असल्याने जिल्ह्यात सध्यातरी लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. लॉकडाऊन लागू करणे हा पर्याय नसून ते कुणालाही परवडणारे नाही असे सांगत कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ठळक मुद्देलॉकडाऊन लागू केला म्हणजे कोरोनाची साखळी तुटेल असे नाही.

निर्बंध कठोर : रुग्ण खाटा वाढविण्याची सूचना नाशिक : कोरोना रुग्णांसाठी सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अर्थचक्र सुरू ठेवण्याला प्राधान्य द्यावे लागणार असल्याने जिल्ह्यात सध्यातरी लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. लॉकडाऊन लागू करणे हा पर्याय नसून ते कुणालाही परवडणारे नाही असे सांगत कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता मागील आठवड्यातच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कठोर निर्बंधाचे संकत दिले होते. त्यामुळे गुरुवारी (दि. १) सायंकाळी नियोजन भवनातील कोरोना आढावा बैठकीनंतर ते काय काय निर्णय घेतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागले होते. मात्र, जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे सांगून त्यांनी चर्चेला विराम दिला. लॉकडाऊन एकदम लागू करता येणार नाही, तशी वेळ आलीच तर तीन ते चार दिवस आगोदर नियोजन करावे लागते. सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधून काढणे, योग्य विलगीकरण करणे, याबरोबरच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या उपायोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने सिव्हीलमध्ये ३००, तर मनपा आणि अन्य खासगी रुग्णालयांमध्ये किमान १००० खाटा वाढविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. २२४ व्हेंटिलेटर बेडस‌्चा वापर पुर्ण क्षमतेने करण्याबाबतची कार्यवाही करावी असेदेखील आदेश पालकमंत्र्यांनी दिले.जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहेच, शिवाय उत्तर महाराष्ट्रातूनही अनेक रुग्ण दाखल होत आहेत. या सर्वांनाच आरोग्य सुविधा पुरविण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळाला नाही अशी तक्रार राहणार नाही. यासाठी जास्तीत जास्त रुग्ण खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात किमान एक हॉस्पिटल अधिग्रहित करण्याबरोबरच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेडस‌् हे ताब्यात घेण्याची कारवाई करून जास्तीत जास्त बेडस‌् उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले.खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेडस् घेणाररुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याने आता खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेडस‌् राखीव ठेवण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना मनपा आयुक्तांना करण्यात आली. सरकारी दराप्रमाणे रुग्णांकडून दर आकारणी केली जाईल याची दक्षता घेण्यबरोबरच खासगी रुग्णालयांकडून जादा बिल घेतले जात असेल तर अशा तक्रारींची दखल घेण्याची सूचनादेखील पालकमंत्र्यांनी केली. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि एसएमबीटी हे दोन्ही पूर्णवेळ कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत असतील, असेही त्यांनी सांगितले.--इन्फो--.. तर त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल कराविलगीकरणात असलेले रुग्ण खरोखरीच विलगीकरणात आहेत का, याबाबतची चौकशी करून गरज असेल अशा रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची कार्यवाही करावी, मनपा आयुक्तांनी त्यांची व्यवस्था करावी, अशा सक्त सूचना पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिल्या आहेत.अधिकारी फिल्डवर असावेतजिल्हाधिकाारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, तसेच ज्यांच्यावर कोरोना नियंत्रणाची जबाबदारी आहे, अशा अधिकाऱ्यांनी अर्धा दिवस फिल्डवर असले पाहिजे. अर्धा दिवसच त्यांनी कार्यालयात थांबावे अशा सूचना करण्यात आल्या.संबंधितांवर गुन्हे दाखल करणारमहापालिका प्रवेशद्वारावर आणलेल्या रुग्णाचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. रुग्णाला मनपा मुख्यालयात आणल्यापासूत ते संबंधिताला जिल्हा रुग्णालयात बेड नाकारण्यात आला का? यात नेमके काय चुकले याची पोलीस चौकशी करतील, असे भुजबळ यांनी सांगितले.तीन दिवसांनी घेणार आढावाकोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबरोचर कारवाईच्यादेखील सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांना नियोजनाची आणि कारवाईचीदेखील जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या कामकाजाचा आढावा पुढील तीन दिवसांनंतर घेतला जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.लॉकडाऊन लागू केला म्हणजे कोरोनाची साखळी तुटेल असे नाही. कोरोना हा राहणारच आहे. शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त होईपर्यंत लॉकडाऊन लागू करणे शक्य नाही. एका रुग्णाकडून तो दुसऱ्याला बाधित करणारच आहे. म्हणून कोरोना कधी संपुष्टात येईल हे देखील सांगता येणार नाही. त्यामुळे रुग्ण आढळले म्हणून लॉकडाऊन करा, असे म्हणणे हे संयुक्तिक होणार नाही.- छगन भुजबळ, पालकमंत्री.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार