शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अग्निसुरक्षा नसल्याने ५० क्लासेसवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:17 IST

अग्निसुरक्षा साधने नसल्याने शहरातील सुमारे पन्नास खासगी क्लासेसवर कारवाईचे गंडांतर आले आहे. अशा क्लासेसचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमनपाची तयारी : अन्य ठिकाणी उपाययोजना सुरू

नाशिक : अग्निसुरक्षा साधने नसल्याने शहरातील सुमारे पन्नास खासगी क्लासेसवर कारवाईचे गंडांतर आले आहे. अशा क्लासेसचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.सुरत येथील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये आग लागल्याने अनेक विद्यार्थ्यांनी भीतीपोटी इमारतीवरून उड्या मारल्या त्यात अनेकांचा अंत झाला होता. त्यानंतर नेहमी हॉस्पिटलच्या मागे लागलेल्या महापालिकेने खासगी कोचिंग क्लासेस चालकांकडे मोर्चा वळवला होता. खासगी क्लासेसची तपासणी करून त्यानंतर अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. एकूण ३१९ पैकी ४२ क्लासेसमध्येच अग्निप्रबंधक उपाययोजना केल्याचे आढळले होते. उर्वरित क्लासचालकांना नोटिसा बजावल्यानंतर त्यांनी धावपळ सुरू केली. त्यामुळे २६९ क्लासचालकांनी उपाययोजना करण्याची तयारी दर्शविली असून, ७९ क्लासचालकांनी महापालिकेला त्याबाबत लेखी कळवले आहे आणि कार्यवाही करण्यासाठी अवधी मागितला आहे. परंतु ५० क्लासचालकांनी मात्र काहीच दाद दिली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू झाली आहे. संबंधितांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.विशेष म्हणजे महापालिकेच्या तपासणीत अनेक क्लासचालकांनी परस्पर बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचेही आढळले आहे. मूळ रचनेतील हे बदल तपासण्यात येणार असून नियमबाह्य बांधकाम पाडण्यात येणार आहे. त्यास विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.स्वागत हाईटला पाणीपुरवठा सुरूसातपूर भागातील कामगार भागातील स्वागत हाईट्स या अपार्टमेंटचा पाणीपुरवठा तब्बल १८ महिन्यांनंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यामुळे सुरू झाला आहे. अग्निशमन नियमांचा भंग करून वाढीव बांधकाम करण्यात आल्याने या इमारतीचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. येथील सदनिकाधारकांचे आपसातील आणि विकासकाशी असलेले वाद, न्यायालयातील दावे प्रतिदावे यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतरही त्यावर कोणीही अधिकारी सवलत देण्याचे धाडस करीत नव्हते.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाfireआग