शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

राज्य आणि केंद्रातही मंत्रिपद हवे

By admin | Updated: November 24, 2015 23:07 IST

रामदास आठवले : आमीर खान देश सोडून गेलेच तर परत आणू

नाशिक : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून, त्यात ठरल्याप्रमाणे आरपीआयला स्थान दिलेच गेले पाहिजे. आपल्याला राज्यात परतण्याची इच्छा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्याला केंद्रात मंत्री करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोेलताना केली.नाशिक दौऱ्यावर आल्यावर शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २६ व २७ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संसदेचे दोनदिवसीय विशेष हिवाळी अधिवेशन बोलविण्यात आले असून, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेविषयी आणि संविधानावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यघटनेचे महत्त्व कळाल्यामुळेच त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा दिली. लंडनचे घर विकत घेतले. ते भाजपा व संघाचे नसून देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणून ते त्यांच्या पक्षाचा रंग तिरंगा सांगत असल्याचे यावेळी खासदार रामदास आठवले यांनी सांगितले. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, भाजपाचा सर्वात मोठा मित्रपक्ष म्हणून आरपीआय असून मंत्रिमंडळात आरपीआयला जागा मिळाली पाहिजे. आपल्या पत्नीला आपण मंत्री करणार असल्याच्या चर्चा सुरू असून, त्या निरर्थक आहेत. मंत्रिमंडळात आपण पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची यादीच तयार असून, त्यातून आपण प्रत्येकाला संधी देणार आहोत. कोणाला मंत्रिपद, तर कोणाला महामंडळावर संधी देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आरपीआयचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी लवकरच आपण जिल्हानिहाय दौरे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष नगरसेवक प्रकाश लोंढे, पवन क्षीरसागर, सुनील वाघ, दीपक डोके आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)