शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ट्रॅव्हल्सवर दोन चालक असावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:32 IST

नाशिक : रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत सर्वाधिक रस्ते अपघात होत असून, याचे प्रमुख कारण चालकास लागणारी डुलकी असल्याचे समोर आले आहे़ मात्र, खासगी बसवरील चालक रात्रं-दिवस वाहन चालवितात़ रात्रीचे अपघात कमी करण्यासाठी एसटीप्रमाणेच खासगी बसेसवरही दोन चालक ठेवणे बंधनकारक करावेत, असा प्रस्ताव नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी ६ जुलै २०१८ रोजी शासनाकडे पाठविला आहे़ यामुळे रोजगारनिर्मिती व प्रवासी सुरक्षितता असे हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे़

ठळक मुद्देशासनाकडे प्रस्ताव सादर : प्रवासी सुरक्षिततेसाठी उपाययोजना

विजय मोरे ।नाशिक : रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत सर्वाधिक रस्ते अपघात होत असून, याचे प्रमुख कारण चालकास लागणारी डुलकी असल्याचे समोर आले आहे़ मात्र, खासगी बसवरील चालक रात्रं-दिवस वाहन चालवितात़ रात्रीचे अपघात कमी करण्यासाठी एसटीप्रमाणेच खासगी बसेसवरही दोन चालक ठेवणे बंधनकारक करावेत, असा प्रस्ताव नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी ६ जुलै २०१८ रोजी शासनाकडे पाठविला आहे़ यामुळे रोजगारनिर्मिती व प्रवासी सुरक्षितता असे हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे़गत महिन्यात ७ जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातात दहा ठार तर १३ जण जखमी झाले होते़ विशेष म्हणजे या बसवर एकच चालक होता. त्यास पहाटे डुलकी लागल्याने नादुरुस्त ट्रकवर जाऊन त्याचे वाहन आदळल्याचे तपासणीत समोर आले़राज्य परिवहन महामंडळातील चालक हे सहा तासांहून अधिक वाहन चालवित नाही.  तसेच ठराविक अंतरानंतर चालक बदलला जात असल्याने अपघातांची संख्या कमी आहे़ त्या तुलनेत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात व जीवितहानी अधिक आहे़ त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांनी आपल्या अधिकाºयांद्वारे बसेसवरील चालकांबाबत सर्वेक्षण केल्यानंतर रात्रीच्या वेळी एकच चालक असल्याचे तसेच अंतर कापण्यासाठी सर्रास वेगमर्यादेचे उल्लंघन व त्यातून अपघात असे चक्र समोर आले़राष्ट्रीय व राज्य परवाना असलेल्या वाहनांवर दोन चालक असावेत, असा नियम आहे़ त्याप्रमाणेच रात्रीच्या वेळी खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर दोन चालक असावेत, असा नियम केल्यास अपघातांना बºयापैकी आळा बसण्यास मदत होईल़ अर्थात, यासाठी मोटार परिवहन कायद्यात बदल वा अध्यादेश काढावा लागेल़ दोन चालक असल्याशिवाय वाहनांची तपासणी केली जाणार नाही, असा दंडक कायद्यानुसार केल्यास नक्कीच बदल होईल़प्रस्तावापूर्वी सर्वेक्षणशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांनी आरटीओ अधिकाºयांच्या पथकास विभागातील खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसेसवरील चालकांबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार आरटीओच्या पथकाने सुमारे महिनाभर वाहनांवरील चालकांची तपासणी करून त्याचा अहवाल तयार केला़ त्यानुसार रात्रीच्या वेळी प्रवास करणाºया खासगी बसेसवर एकच चालक असल्याचे समोर आले़सुरक्षिततेबरोबरच रोजगाराचीही निर्मितीएसटीप्रमाणेच खासगी ट्रॅव्हल्सवरही दोन चालक असल्यास एकास झोप येत असल्यास दुसरा चालक वाहन चालवेल़ यामुळे अपघात कमी होण्यास तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ होईल़ याबरोबरच दोन चालक ठेवावे लागणार असल्याने आपोआपच रोजगाराचीही निर्मिती होईल़ थोडक्यात, वाहनमालकास दुसºया चालकासाठी दरमहा पंधरा हजार रुपयांचा खर्च करावे लागतील असे गृहीत धरल्यास प्रतिदिन ५०० रुपये खर्च येईल़ हाच खर्च पन्नास प्रवाशांमध्ये विभागला तर प्रतिप्रवासी अवघा दहा रुपये येतो़किमान २४ तासांमध्ये सहा तास झोप अनिवार्य आहे, मात्र वाहनांवरील चालक हे सतत दोन - तीन दिवस वाहन चालवित असतात़ रात्रीच्या व पहाटेच्या वेळी चालकाची अपूर्ण झोप झाल्यामुळे त्याास डुलकी येणे स्वाभाविक आहे़ यामुळे अपघात घडतात व जीवितहानी होते़ हे टाळण्यासाठी नाशिक विभागातील वाहनांवरील चालकांबाबत सर्वेक्षण केल्यानंतर एसटी, नॅशनल तसेच स्टेट परमिट असलेल्या वाहनांप्रमाणे खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसमध्ये दोन चालक असल्यास अपघातात नक्कीच आळा बसेल़ त्यानुसार शासनाकडे हा प्रस्ताव पाठविला आहे़- भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक