शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मग महापौरांवर गुन्हा का नाही? 

By श्याम बागुल | Updated: November 26, 2018 16:15 IST

शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यांची बदली केली त्याबाबत समाधान व्यक्त करणा-या महापौरांनी मात्र

श्याम बागुलनाशिक : घराच्या अंगणात कोणा तिºहाईताने कचरा आणून टाकला तर अंगाचा तिळपापड होऊन संबंधितांच्या वाडवडिलांचा उद्धार केला जातो, त्यातही जर कचरा टाकणाऱ्याची ओळख पटली तर प्रसंगी प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते. अशी समाजाची मानसिकता असताना शहराच्या प्रथम नागरिकाच्या घरासमोरच अज्ञात व्यक्ती फटाक्यांचा कचरा करून पलायन करीत असेल तर त्याची दखल घेणे अधिकच क्रमप्राप्त ठरते. परंतु प्रथम नागरिकानेच या फटाक्यांच्या कचºयाबद्दल मौन पाळणे व कचरा आपण केलेलाच नाही, असा निर्वाळा देणे म्हणजे एकतर त्यांनी जाणूनबुजून या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले किंवा फोडलेल्या फटाक्यांच्या कचºयाबाबत त्यांची कोणतीही तक्रार नाही, असे मानावे काय?शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यांची बदली केली त्याबाबत समाधान व्यक्त करणाºया महापौरांनी मात्र घरासमोर फोडलेल्या फटाक्यांबाबत अनभिज्ञता दर्शवित, आपण फटाके न फोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याबाबत जे काही नियम, निकष ठरवून दिले ते डावलून ‘रामायण’च्या बाहेर फटाके फोडण्यात आल्याने त्याला जबाबदार धरून महापौरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एका सामाजिक संस्थेने करून तशी तक्रार पोलिसांत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी दिलेल्या स्पष्टीकरणाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे रामायण बंगल्याबाहेर फटाके कोणी फोडले हा विषय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो महापौरांनी फटाक्यासारखी जीविताला घातक वस्तू कोणी अज्ञाताने आपल्या निवासस्थानाबाहेर फोडूनही त्याकडे दुर्लक्ष करणे अधिक गंभीर आहे. मुळात शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या उपस्थितीत एखाद्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पायदळी तुडवून फटाके फोडणे हा जसा कायदेशीर गुन्हा आहे, तसाच त्याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात कुचराई करणे हादेखील कायदेशीर गुन्हाच आहे. घटनेत व कायद्यातही एखादे गैरकृत्य होत असताना त्याकडे जाणूनबुजून वा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे गुन्हा मानला गेला असताना या संदर्भात पोलिसांची भूमिकाही निश्चितच संशयास्पद आहे. महापौर यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु इतक्या गंभीर गुन्ह्यात महापौरांनी मौन पाळणे व निवासस्थानाबाहेर फटाके फुटूनही त्याबाबतची माहिती पोलिसांना न दिल्याने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणे तितकेच गरजेचे आहे. शहराचा प्रथम नागरिक आपल्या स्वत:च्या जीविताच्या संरक्षणासाठी इतके अक्षम्य दुर्लक्ष करीत असेल तर शहरातील नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणी घ्यावी? आता खरी कसोटी आहे ती पोलिसांची, फटाके फोडणा-यांविरुद्ध गुन्हा तर दाखल आहेच, पण त्याची माहिती दडविणा-यांबाबत काय?

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक