नाशिक : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सक्षम व्हावी, जेणेकरून रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, यादृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने प्रादेशिक परिवहन विभागाला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकाचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीकडून शहराच्या प्रादेशिक परिवहन विभागाला थेट सहा वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे शहरात अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी आदेशित केले आहे. तसेच या नियमांचे वाहनचालकांनी उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...तर थेट वाहन परवान्यांचे निलंबन : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
By admin | Updated: March 16, 2017 22:14 IST