शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

...तर ‘सेल्फी’चा नाद जिवावर बेतला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:47 IST

द्राक्षमळ्यात तारेच्या जाळ्यात बिबट्या अडकतो... पाच तासांपासून बिबट्या सुटकेसाठी प्रयत्न करत आक्रमक होतो... डरकाळ्यांचा आवाज आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या कानी पडतो... सगळेच मळ्याच्या दिशेने धाव घेतात आणि याचवेळी एक तरुण अतिउत्साह दाखवत अडकलेल्या बिबट्यासोबत चक्क ‘सेल्फी’ टिपण्यासाठी आटापिटा करतो, हे बघून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला.

नाशिक : द्राक्षमळ्यात तारेच्या जाळ्यात बिबट्या अडकतो... पाच तासांपासून बिबट्या सुटकेसाठी प्रयत्न करत आक्रमक होतो... डरकाळ्यांचा आवाज आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या कानी पडतो... सगळेच मळ्याच्या दिशेने धाव घेतात आणि याचवेळी एक तरुण अतिउत्साह दाखवत अडकलेल्या बिबट्यासोबत चक्क ‘सेल्फी’ टिपण्यासाठी आटापिटा करतो, हे बघून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला.  चाडेगाव शिवारातील द्राक्षमळ्यात मृतावस्थेत पडलेले डुक्कर खाण्यासाठी नर बिबट्या पहाटेच्या सुमारास शेतात आला; मात्र येथील द्राक्षबागेला लावलेल्या जाळीमध्ये त्याचे मागील दोन्ही पाय आणि शेपूट अडकली. वाघ मळ्यात बिबट्या द्राक्षबागेत अडकल्याची माहिती परिसरात वाºयासारखी पसरली. बघ्यांनी शेताच्या दिशेने धाव घेत गर्दी केली. यावेळी गर्दीमधील एका अतिउत्साही तरुणाने तर प्रताप केला.  अडकलेल्या बिबट्याच्या अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या अंतरावरून त्याने बिबट्याच्या तोंडाच्या दिशेने पाठ करत खाली बसून ‘सेल्फी’ क्लिक केली. एकदा नव्हे तर दोन, तीनवेळा तो तरुण ‘सेल्फी’ टिपण्याचा प्रयत्न करताना चित्रफितीत दिसतो. यावेळी आजूबाजूचे लोक त्याचे नाव घेत ओरडून त्यास बाजूला होण्यास सांगतानाही लक्षात येते; मात्र तरुणाने कोणाच्याही म्हणण्याकडे लक्ष न देता ‘सेल्फी’ची हौस भागविली. सुदैवाने यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, अशी चर्चा उपस्थित जमलेल्या नागरिकांमधून सुरू होती.भक्ष्याचा पाठलाग करताना तोंडी आलेला घास निसटला आणि बिबट्या जाळ्यात फसला त्यामुळे तो अधिक आक्रमक व चवताळलेला होता. वनविभागाच्या कर्मचाºयांपुढेही त्याला सुरक्षित जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले होते. अशावेळी प्रशासनाला आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करण्याऐवजी तरुण वर्ग बेजबाबदार व बेभानपणे वागत सेल्फी व छायाचित्रे काढण्यासाठी स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात....अन्यथा पळता भुई थोडी झाली असतीबिबट्याचे मागील पाय जाळी व तारेमध्ये अडकलेले होते. तसेच बिबट्या कमी वयाचाही नव्हता. नर बिबट्या पूर्णत: प्रौढ असल्याने शरीराने मजबूत व ताकदवान होता; मात्र शेपटाला तारेचा पीळ बसल्यामुळे त्याचे निसटण्याचे प्रयत्न कमी पडले. अन्यथा जमलेल्या बघ्यांना पळता भुई थोडी झाली असती आणि अशा सेल्फीचा नाद करणाºयांनाही त्याचा फटका बसला असता, अशी चर्चा सुरू होती.

टॅग्स :NashikनाशिकSelfieसेल्फीleopardबिबट्या