शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर महाराष्ट्र बंदची हाक : कामगारांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 19:01 IST

मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील काही उद्योजकांकडून कामगारांच्या हिताचा किमान वेतन कायदा पायदळी तुडविला जात आहे.

ठळक मुद्देजुलै महिन्यात महाराष्ट्र बंदची हाक कामगार देतील असा इशारा.औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमध्ये असंतोषाची भावना

नाशिक : शहरातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या बेफाम कामगारविरोधी कृ तीच्या निषेधार्थ सी.आय.टी.यू व जिल्हा कामगार कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. कामगारांवर होणारा अन्याय न थांबल्यास तसेच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्यात आलेल्या डॉ. डी. एल. कराड यांची मुक्तता न झाल्यास पुढील जुलै महिन्यात महाराष्ट्र बंदची हाक कामगार देतील, असा इशारा मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला.मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील काही उद्योजकांकडून कामगारांच्या हिताचा किमान वेतन कायदा पायदळी तुडविला जात आहे. तसेच कामगारांविरोधी धोरण औद्योगिक वसाहतींमध्ये राबविण्याचा प्रतापही केला जात असून, यामुळे नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होत असल्याचा आरोप करीत शहरातील बी. डी. भालेकर मैदानापासून बुधवारी (दि. ६) भारतीय ट्रेड युनियन केंद्राच्या (सीआयटीयू) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक एल्गार मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व आडम, संघटनेचे सीताराम ठोंबरे, उपाध्यक्ष श्रीधर देशपांडे, अ‍ॅड. वसुधा कराड, सईद अहमद, अ‍ॅड. तानाजी जायभावे आदींनी केले.

औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या कामगारांनी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले असून, संघटनेने समूहाला किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडल्याचे शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या समूहाच्या अन्य कामगारांनीही सभासदत्व घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने स्पर्धा निर्माण होऊन हाणामारीची घटना औद्योगिक वसाहतीत घडली. उद्योजक समूहाकडून चिथावणी देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याअंतर्गत पोलिसांना हाताशी धरून संबंधित कारखान्यांच्या मालकाने कामगारांचे राज्याचे नेते डॉ. डी. एल. कराड यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या कलमाखाली खोटा गुन्हा कामगारांना प्रलोभन दाखवून नोंदविल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorतहसीलदार