शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

...मग नृत्य कार्यक्रम, शाळांची स्नेहसंमेलने होणार तरी कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:58 IST

शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असणाऱ्या कालिदास कलामंदिरचे अवाच्या सवा भाडे वाढविण्यात आले आहेत. या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत  आहे.

नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असणाऱ्या कालिदास कलामंदिरचे अवाच्या सवा भाडे वाढविण्यात आले आहेत. या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत  आहे.  कालिदासची दरवाढ झाल्याने आजवर वर्षानुवर्षे या संस्थेत मिळणारा जिव्हाळा क्षणात दूर होऊन तेथे व्यावसायिक वृत्ती वाढीस लागली आहे. याचा फटका आयोजकांना तर बसेलच, पण नाशिककर रसिकांनाही त्याची झळ बसणार आहे. त्यामुळे कालिदासची भाडेवाढ मागे घ्यावी, अशा भावना वितरक, शैक्षणिक संस्था, नृत्यसंस्था आदींच्या प्रतिनिधींनी बोलून दाखविल्या. याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद. कालिदासचे एवढे वाढलेले भाडे परवडणारेच नाही. थोडीफार वाढ केली असती तर ते समर्थनीय झाले असते, पण ही वाढ फारच आहे. मुळात नृत्य संस्था नृत्यमहोत्सव मोफत सादर करत असतात. प्रेक्षकांकडून त्याचे पैसे घेतले जात नाही. विद्यार्थ्यांकडून वर्गणी काढून वा इतर ठिकाणांहून पैसे जमवून नाट्यगृहाचे भाडे, प्रवासखर्च आदी भागवला जातो. कालिदासने मोफत लाइट साउंड मॅनेज करून द्यावे. दरवाढ केली तर कला जोपासना कठीण होईल.- सोनाली करंदीकर, नृत्यांगनाकालिदास हा आम्हा कलाकारांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शास्त्रीय कलांना प्रोत्साहन देण्याचे काम कालिदासच्या माध्यमातून होते. आमच्यासारखे कलाकार शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम करताना तेथे फारशी आर्थिक उलाढाल करत नाही. त्यामुळे ही गोष्ट ओळखून आम्हाला आजवर सेवा मिळत आली. ती पुढे मिळेल याची शाश्वती वाटत नाही. कालिदासने केलेली भाडेवाढ पाहता वर्षातून एकदा तरी तेथे कार्यक्रम करणे शक्य होइल का? याची शंका वाढते. इतर कार्यक्रमांना तिकीट दरवाढ झाली तर लोक येतील का? हाही प्रश्न निर्माण होतो. दरवाढ मागे घ्यावी.  - सुमुखी अथनी, नृत्यांगनाकालिदासचे वाढवलेले भाडे खूपच जास्त आहे. हे दर आता पुण्या-मुंबईतील दरांच्या जवळ जाऊन पोहोचले आहे, पण तेथील सांस्कृतिक वातावरण आणि इथले वातावरण यात खूप फरक आहे.  तो समजावून घेतला पाहिजे. भाडेवाढीमुळे तिकीट दर वाढतील. लोकांवर आर्थिक बोजा येऊन प्रेक्षकसंख्या घटेल. कालिदासची ओळख जर कलेला व्यासपीठ देणारे असेल तर अशा दरवाढीने ती पुसट होऊ शकेल. ही दरवाढ मागे घेणे गरजेचे आहे. अन्यथा कलावंतांना याठिकाणी कार्यक्रम करणे अवघड होईल.  - विद्या देशपांडे, ज्येष्ठ नृत्यांगना

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका