नाशिकरोड : विविध भागांतून चोरलेल्या सहा मोटारसायकली पोलिसांनी जप्त करून नगर जिल्ह्यातील अकोले येथील तिघा चोरट्यांना अटक केली आहे. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे व उपनिरीक्षक सचिन खैरनार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हवालदार अरुण पाटील, श्याम कोटमे, उत्तम पवार, प्रकाश भालेराव, अनिल लोंढे आदिंनी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून संशयितरीत्या फिरणाऱ्या आनंद बशीर पाथवे (२०) रा. कळसखुर्द अकोले यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता दोन साथीदारांच्या मदतीने शहराच्या विविध भागांतून सहा मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयित पाथवे याने दिलेल्या माहितीनुसार नवनाथ जयवंता गावंडे, एकनाथ नमाजी फोडसे, रा. अकोला जि.नगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ स्प्लेंडर, २ डिस्कव्हरी, १ सीबीझेड अशा सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)
चोरीच्या सहा दुचाकी जप्त
By admin | Updated: October 16, 2015 23:52 IST