नाशिक : महापालिकेच्या जेलरोड येथील मनपा उपविभागीय कार्यालयाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी लेनोव्हा कंपनीचा टॅब चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनिल म्हाळूजी आव्हाड (रा.कौशल्यानगर,रामवाडी) यांनी याप्रकरणी तक्र ार दाखल केली आहे. गुरूवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शिवाजीरोड वरील मनपाच्या विभागीय कार्यालयाचा कडी कोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी शासकिय कागदपत्रांची उलथा पालथ करून लोखंडी कपाटात ठेवलेला चार हजार रूपये किमतीचा टॅब चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.
पालिकेच्या कार्यालयात चोरी
By admin | Updated: April 22, 2017 20:23 IST