लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहर परिसरातून रात्रीच्या सुमारास रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गायींची चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातून मोकाट गायींची रात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून चोरी होत आहे. विशेष म्हणजे चारचाकी वाहनातून येऊन गायींना भुलीचे इंजेक्शन देऊन ही चोरी होत असल्याचे उघड होत आहे. दोन दिवसांपूर्वी गाय चोरीची घटना घडल्याचे गो-रक्षकांकडून सांगितले जात आहे. तर रविवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास विंचूर रोड परिसरात कुत्र्यांच्या भुंकण्याने जागे झालेल्या नागरिकांनी एका चारचाकी वाहनातून गायी नेल्या जात पाहिले.काही गो-रक्षक धावून आले मात्र वाहन नाशिकच्या बाजूने फरार झाल्याचे कळते. तर चार-सहा गायींना भुलीचे इंजेक्शन दिल्याचे आढळून आल्याने पशू चिकित्सकांना पाचारण करून गायींवर उपचार करण्यात आले.शहरात मोठ्या संख्येने मोकाट गायी आहेत. या गायी कळपाने रस्त्यांच्या कडेला बसलेल्या असतात. मोकाट गायींची चोरी होत असल्याने यासंदर्भात तक्रार केली जात नाही. या प्रकरणी पोलीस यंत्रणेने लक्ष घालण्याची मागणी गोप्रेमींकडून केली जात आहे.
येवल्यातून मोकाट गायींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:20 IST
लोकमत न्यूज नेटवर्क येवला : शहर परिसरातून रात्रीच्या सुमारास रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गायींची चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
येवल्यातून मोकाट गायींची चोरी
ठळक मुद्देचार-सहा गायींना भुलीचे इंजेक्शन दिल्याचे आढळून आले.