लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राजदूत हॉटेल ते मायको सर्कल यादरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ७५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली़ मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मीना करणसिंग कच्छवा (रा़ रो-हाऊस नंबर ४, अनसाई हौसिंग सोसायटी, अशोकनगर, नाशिक) या शुक्रवारी घरी जाण्यासाठी राजदूत हॉटेलपासून रिक्षामध्ये बसल्या़ मायको सर्कलला पोहोचेपर्यंत रिक्षाचालक व पाठिमागे बसलेल्या भामट्यांनी त्यांच्या बॅगेची साखळी खोलून डब्यात ठेवलेले ६० हजार रुपये किमतीची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १५ हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम वजनाचे कानातले झुबे व ८०० रुपये रोख, असा ७५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी कच्छवा यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
रिक्षा प्रवासात महिलेच्या दागिन्यांची चोरी
By admin | Updated: May 22, 2017 02:47 IST