शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूमीदिनाच्या दिवशीच रंगले  मानापमान नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:37 IST

मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने रंगभूमी दिनावरून मानापमान नाट्य रंगले आहे.

नाशिक : मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने रंगभूमी दिनावरून मानापमान नाट्य रंगले आहे. महापौरांदी पदाधिकाºयांना डावलण्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून नजीकच्या काळात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  दरवर्षी मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने रंगमंच आणि नटराज पूजनाचा कार्यक्रम होत असतो. त्याला शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर तसेच अन्य पदाधिकाºयांना बोलवले जात असते. परंतु यंदा मात्र परंपरा खंडित झाली. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते किंवा सभागृह नेता, गटनेता इतकेच नव्हे तर प्रभागाच्या नगरसेवकांनाही न बोलवता केवळ स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्तेच नटराज पूजन करण्यात आले. नाशिकच्या रंगभूमीचा उज्ज्वल काळ सध्या सुरू आहे. अनेक मालिकांमध्ये नाशिकचे कलावंत नाव गाजवत असल्याचे यावेळी आडके यांनी मनोगतात सांगितले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी परिषदेच्या कामकाजाची माहिती दिली. कार्यक्रमास लक्ष्मण सावजी, मधुकर झेंडे, विवेक पाटणकर, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सदानंद जोशी, श्रीकांत बेणी, हेमंत महाजन, गिरीश गर्गे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन राजाराम भुसारे यांनी केले तर आभार सुनील ढगे यांनी मानले.मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी मनपाच्या वतीने कार्यक्रमास निमंत्रित केले जाते. परंतु यंदा निमंत्रण मिळालेच नव्हते. अनेक नगरसेवक आणि मनपाच्या पदाधिकाºयांना- देखील निमंत्रण नसल्याने कार्यक्रमास जाऊ शकले नाही.- रंजना भानसी, महापौरपदाधिकाºयांना डावलण्यात आले आहे. व्यवस्थापक कोण आहेत हेच कळत नाही. त्यामुळे मिळकत व्यवस्थापकांना भेटून संस्कृती ही संस्था कालिदास चालविण्यात तयार आहे हेच सांगितले आहे. बाकी गोष्टी महापालिकेने सांभाळाव्या,- शाहू खैरे, उपाध्यक्ष, नाट्य परिषद, नाशिक शाखामराठी रंगभूमी दिनाचा कार्यक्रम यंदा दिवाळीमुळे छोट्याखानी पध्दतीनेच मर्यादित व्यक्तींमध्ये साजरा करण्यात आला. अगदी नांदीदेखील सादर झालेली नाही. त्यात कोणालाही डावलण्याची भूमिका नाही. दरवर्षी रंगभूमी दिन आणि महापालिकेचा वर्धापनदिन असे तीन दिवस कार्यक्रम होतात. परंतु यंदा दिवाळीत हे दिवस आल्याने सर्व सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. नाट्य परिषदेच्या वतीने महोत्सव दिवाळीनंतर होणार असून त्यावेळी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्य परिषद, नाशिक शाखा

टॅग्स :artकलाNashikनाशिकcultureसांस्कृतिक