शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आव्हान अंगावर घेण्याच्या धाडसामुळेच राज्यात नवीन सरकार-एकनाथ शिंदे

By नामदेव भोर | Updated: October 21, 2022 17:32 IST

सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक- मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजी राजे छत्रपती आझाद मैदानावर बसले होते. तेव्हा सर्वांचीच धावपळ उडाली आणि अशात आव्हान अंगावर घेण्याची वेळ आल्यामुळे मला पुढे करण्यात आले. परिस्थिती अंगावर घेण्याची वेळ आली की नेहमी मलाच पुढे केले जात होते. अशीच आव्हाने अंगावर घेण्याच्या धाडसामुळे राज्यात नवीन सरकार आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

नाशिक विभागीय कार्यालयाच्या आवारात सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे शुक्रवारी (दि.२१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आमदार दिलीप बनकर, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले. देवयानी फरांदे,नरेंद्र दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, जिल्हाधिकारी डी गंगाथरण, आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. राज्याचे प्राधान्यक्रम शिक्षण, आरोग्य, कृषी, शेतकरी विकासाला असल्याचे नमूद करतानाच राज्यातील मराठा, कुणबी मराठा, कुणबी, आणि मराठा कुणबी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सारथीचे काम सुरू आहे.  मध्यंतरी दोन ती वर्षाच्या कालावधीत हे काम थांबले असले तरी आता समाजातल्या दीन दुबळ्यांसाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी त्यांच्या कल्याणासाठी,मराठा तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी सारथीच काम पुन्हा रुळावर आणण्यासाठी हवी ती मदत आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मराठा समाजाला मागास सिद्ध करण्याचे प्रयत्न

सारथीच्या उद्घाटन सोहळ्यात संभाजी राजे छत्रपती यांनी नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनामुळे सरकारडून अपेक्षित काम होत असल्याचे समाधान व्यक्त केले. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी राज्य सरकारने पुन्हा सर्वेक्षण करण्याची तसेच सारथीचे काम ग्रामीण भागातही पोहचविण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर मराठा आरक्षणासाठी उप समितीच्या माध्यमातून आवश्यक ती पूर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले

टॅग्स :NashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदे