शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोठारी कन्या शाळेत पाठ्यपुस्तक वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:57 IST

जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींची प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींचे स्वागत करून पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

नाशिकरोड : जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींची प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींचे स्वागत करून पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.  शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त शाळेमध्ये पताका, फुगे लावून सजावट करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प, फुगे, खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक सुरेखा बोकडे यांच्या हस्ते पहिल्या दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प, फुगे, खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष विश्वास बोडके, मुख्याध्यापक सुरेखा बोकडे, पर्यवेक्षक कैलास पाटील, पालक संघ उपाध्यक्षा शुभांगी गगनभिडे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विद्या लाड, व्यवस्थापन समिती सदस्य जगन्नाथ गायकवाड आदिंच्या हस्ते विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके व संस्थेच्या संगणक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सुरेखा पाटील व आभार जयश्री भडके यांनी मानले. यावेळी सुनीता सोनगिरे, रेखा पगार, छाया जाधव, सुषमा यादव, मानसी झनकर, शोभा गरुड, रेवती बुरकुले, निर्मला दिवेकर आदी उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळा विल्होळीविल्होळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रथमत: नवागतांचे कुंकुम तिलक करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशदिंडी, प्रभातफेरी, रथयात्रा काढण्यात आली. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप, गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, मनोहर भावनाथ, अनिल भावनाथ, संतोष आल्हाट, मुख्याध्यापक रवींद्र भदाणे तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी, गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला.मातोरी परिसरातील शाळांत स्वागतमातोरी परिसरातील शाळांचा पहिला दिवस आनंदात व वाजत गाजत झाला, तर नवीन दाखल विद्यार्थ्यांना चॉकलेट व गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल करण्यासाठी पालकांनी पहिल्या दिवशीच गर्दी केली. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी गावातील प्रत्येक घरात जाऊन शालेय जनजागृती केली, तसेच शाळेत दाखल विद्यार्थ्यांच्या घराच्या दारावर नोंदही केली, तसेच विद्यार्थी व पालक यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर तोरणं लावत, रांगोळी काढून व गुलाबाचे फूल देत ढोलताशांच्या स्वरात स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Schoolशाळा