शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

‘टेस्ट ड्राईव्ह’च्या बहाण्याने सफारी लांबविली

By admin | Updated: December 22, 2015 23:42 IST

‘टेस्ट ड्राईव्ह’च्या बहाण्याने सफारी लांबविली

द्वारका जवळील घटनानाशिक : शोरूममध्ये कार विकत घेण्याच्या बहाण्याने आलेल्या संशयिताने टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली तेरा लाखांची नवी कोरी सफारी कार चाकूचा धाक दाखवून (एमएच १५, टीसी १४७४) लांबविल्याची घटना सोमवारी (दि़२१) द्वारकाजवळ घडली़ मुंबई-आग्रा महामार्गावर कंचन मोटर्स हे शो रूम असून, त्यामध्ये देवेंद्र मनोज पवार (शिवशक्ती चौक, सिडको) हे नोकरीस आहेत़ सोमवारी या शोरूममध्ये सफारी कार विकत घेण्याच्या बहाण्याने एक संशयित आला़ त्याने सफारी स्ट्रोम कार व्ही एक्स ४/२ सफेद रंगाची कार पसंत करून तिच्या टेस्ट ड्राईव्हची मागणी केली़ ग्राहकाची ही मागणी कंपनीने मान्य करून टेस्ट ड्राईव्हसाठी प्रतिनिधी मनोज पवार यांना पाठविले़ कारची टेस्ट ड्राईव्ह घेणाऱ्या संशयिताने द्वारका येथे उतरणाऱ्या पुलाच्या सुमारे पंचवीस फूट अगोदर वाहन थांबवून पवार यांच्या गळ्याला चाकू लावला़ तसेच शिवीगाळ करून त्यांना कारच्या खाली ढकलून देऊन पळ काढला़संशयिताने लांबविलेल्या या कारची अद्याप आरटीओ तपासणीही झालेली नाही़ दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती घेऊन तपास सुरू केला आहे़ या प्रकरणी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)