शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:19 IST

मालेगाव : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व दहशतवादी मसुद अजहर याला अटक करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यात धरणे आंदोलन, गावबंद व कँडल मार्च काढण्यात आला. शहीद जवानांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देशहीद जवानांना श्रद्धांजली : मालेगावी धरणे आंदोलन; चांदवडला मूक मोर्चा; कळवणला पुतळ्याचे दहन

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बागलाण तालुका शिवसेनेतर्फे प्रतिकात्मक पुतळ्यासह पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी करतांना शिवसैनिक.

 

मालेगाव : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व दहशतवादी मसुद अजहर याला अटक करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यात धरणे आंदोलन, गावबंद व कँडल मार्च काढण्यात आला. शहीद जवानांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.टेहरेला कडकडीत बंदजम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील टेहरे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.ग्रामस्थांनी पेटत्या मेणबत्त्या हातात घेऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. दिवसभर छत्रपती शिवाजी मार्केटसह गावातील दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आली होती.भारिप बहुजन महासंघपुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन सेनेच्या वतीने कॅँडल मार्च काढण्यात आला. मोसमपुलावरील महात्मा जोतिबा फुले पुतळ्यापासून कॅँडल मार्चला सुरुवात झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.चांदवडला कडकडीत बंदचांदवड : शहरातून पकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर रहे, पाकिस्तानला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही या घोषणा देत शहरातून प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली तर या रॅलीनंतर श्रद्धांजली सभा, निषेध सभा होऊन शिवाजी चौकात दहशतवादी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून चांदवड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. चांदवड येथील नगर परिषदेजवळ सकाळी साडेवाजता सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची सांगण्यात आले. यावेळी घोषणा देत कार्यकर्ते व नेते वरचेगाव, शिंपी गल्ली, श्रीरामरोड, गुजराथ गल्ली, सोमवारपेठ, शिवाजी चौकात आले. तेथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल अहेर, चंद्रेश्वर गडाचे महंत जयदेवपुरी महाराज, भूषण कासलीवाल, जगन्नाथ राऊत उपस्थित होते.